Maharashtra State Cabinet | राज्यात सुपर मार्केट आणि जनरल स्टोअर्समध्ये वाईन विक्रीला परवानगी मिळण्याची शक्यता

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आज राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक (Maharashtra State Cabinet) होत आहे. या बैठकीत अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होऊन निर्णय होण्याची शक्यता आहे. आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत (Maharashtra State Cabinet) वाईनच्या (Wine) खुल्या विक्रीच्या परवानगीचा (Permission) मुद्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. या बैठकीत सुपर मार्केट (Super Market) आणि जनरल स्टोअर्स मध्ये (General Stores) वाईन विक्रीला (Sale) परवानगी मिळणार असल्याचा प्रस्ताव चर्चेला येणार आहे. या बैठकीत राज्यातील ठाकरे सरकार (Thackeray Government) काय निर्णय घेतं याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Sale Of Wine In Supermarket And General Stores)

 

आज दुपारी साडेतीन वाजता राज्य मंत्रिमंडळाची बैठक (Maharashtra State Cabinet) होणार आहे.
या बैठकीत काही प्रस्ताव चर्चेला येणार आहे.
यापैकी एक म्हणजे सुपर मार्केट किंवा जनरल स्टोअर्समध्ये वाईन विक्रीचा प्रस्ताव आहे.
या प्रस्तावावर काय चर्चा होते आणि राज्यभरात वाईन विक्रीच्या खुल्या विक्रीला (Open Sale) परवानगी मिळते का हे पहावे लागेल.

 

मिळालेल्या माहितीनुसार, या प्रस्तावाला भाजपकडून (BJP) विरोध करण्यात येणार असल्याचे बोललं जात आहे.
त्यामुळे जर ठाकरे सरकारने वाईनच्या खुल्या विक्रीच्या प्रस्तावाला परवानगी दिली तर भाजप आक्रमक होत आंदोलन करणार का हे देखील पहावे लागले.

जर हे धोरण अंमलात आले तर…
आतापर्यंत फक्त वायनरीमध्येच (Winery) उघडता येत असलेली वाईनची रिटेल आउटलेट (Retail Outlet) आता स्वतंत्रपणेही सुरु करता यावीत, असाही प्रस्ताव या धोरणात ठेवण्यात आला आहे.
हे धोरण अंमलात आलं, तर डिपार्टमेंटल स्टोअर्स (Department Stores), तसेच सुपर मार्केटमध्येही स्वतंत्र विभाग करुन वाईनची विक्री करता येणं शक्य होणार आहे.

 

वाईनची विक्री किती ?
2020-21 या वर्षाची आकडेवारी पाहिली तर, देशात उत्पादित झालेल्या परदेशी मद्याची विक्री 200 दशलक्ष लिटर झाली.
तर देशी दारुची विक्री 320 दशलक्ष लिटर, बीअरची 30 कोटी लिटर, तर वाईनची केवळ 7 लाख लिटर एवढीच विक्री झाली.

अखिल भारतीय वाईन उत्पादक संघटनेचे (All India Wine Producers Association) अध्यक्ष जगदीश होळकर (Jagdish Holkar) यांनी काही दिवसांपूर्वी सांगितले की, वाईन हे आरोग्यदायी पेय असून, त्याच्या विक्रीत वाढ झाली तर कृषी-अर्थव्यवस्थेलाही (Agro-Economy) चालना मिळू शकते.
वाईन उद्योगाची उलाढाल 1 हजार कोटी रुपयापर्यंत पोहचण्यासाठी 25 वर्षे लागली.
पुढील वाटचाल वेगाने करण्याचे उद्दिष्ट असून 2026 पर्यंत या उद्योगाची उलाढाल 5 हजार कोटीपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट आहे.

 

Web Title :- Maharashtra State Cabinet | maharashtra government may allow sale of wine in supermarket and general stores decision may taken in state cabinet meeting

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा