तनुश्री दत्ता प्रकरण : नाना पाटेकर यांच्यासह चाैघांना राज्य महिला आयोगाकडून नोटीस  

मुंबई : पोलीसनामा आॅनलाईन
तनुश्री दत्ता प्रकरणी अभिनेता नाना पाटेकर यांच्यासह दिग्दर्शक राकेश सारंग, निर्माता समीर सिद्दीकी आणि गणेश आचार्य यांना राज्य महिला आयोगाकडून नोटीस बजावण्यात आली आहे. १० दिवसाच्या आत या नोटीसवर उत्तर देण्याचे आयोगाने म्हटले आहे. गैरवर्तवणुकीचा आरोप करत अभिनेत्री तनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांच्यासह चाैघांविरोधात राज्य महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेत आयोगाने नानांसह चाैघांना नोटीस बजावली आहे.
 [amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’9a605aba-cbc2-11e8-976c-695ab3950404′]

तनुश्रीने महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडे ८ ऑक्टोबरला तक्रार दाखल केली होती. तनुश्रीने ही लेखी तक्रार वकिलामार्फत सादर केली होती. या प्रकरणाची सविस्तर माहिती देण्यासाठी तनुश्रीने आयोगासमोर स्वतः उपस्थित राहून आपले म्हणणे मांडावे, असे निर्देश आयोगाने दिले आहेत.

आयोगाकडे दाखल केलेल्या तक्रारीत तनुश्रीने मुंबई पोलिसांकडे या प्रकरणी गुन्हा दाखल केल्याचे म्हटले आहे. मुंबई पोलिसांकडून याबाबत आतापर्यंत काय कारवाई करण्यात आली, याचा अहवालही आयोगाने मागवला आहे.
[amazon_link asins=’B00DRLASZ6,B0734VLDTC’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’a86400d9-cbc2-11e8-b057-31d85a823768′]
सिनेसृष्टीतील अशा घटनांना रोखण्याची जबाबदारी निर्माते, दिग्दर्शक तसेच संबंधित संघटनांचीही आहे. महिलांबाबत होणारे गैरप्रकार रोखण्यास तसेच तक्रार करण्यासाठी यंत्रणा असणे आवश्यक आहे. यादृष्टीनेच लैंगिक शोषण प्रतिबंध कायदा, २०१३ या कायद्यानुसार ‘सिने अँड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशन’ने तात्काळ तक्रार निवारण समिती (आयसीसी कमिटी) स्थापन करावी, असे निर्देशही आयोगाने दिले आहेत.
दरम्यान, तनुश्री आणि नानांमधील वाद उफाळून आल्यानंतर आणि कायदेशीर बाबी समोर आल्यावर नाना पाटेकर यांनी आपल्या घरी पत्रकार परिषद बोलवली होती. दहा वर्षापूर्वी जे सत्य होते. तेच खरे आहे. मला जे सांगायचे आहे ते मी सांगितले आहे. असे म्‍हणत त्यांनी पत्रकारांचे आभार मानून एक मिनिटाच्या आत पत्रकार परिषद संपवली होती. माझ्या वकिलांनी माध्यमांशी कोणतेही वक्‍तव्य करू नका असे सांगितल्याने मी कोणतीही भूमिका मांडणार नाही असे त्‍यांनी पत्रकार परिषदेवेळी स्पष्ट केले होते.
[amazon_link asins=’B07B3XZ81Y,B01GNXP0R0′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’b5c524fe-cbc2-11e8-aeea-43d989c6f3cd’]
You might also like