Coronavirus : दिलासादायक ! राज्यात गेल्या 24 तासात 34,370 रुग्ण ‘कोरोना’मुक्त, रिकव्हरी रेट 93 %

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मागील दोन महिन्यापासून राज्यात सातत्याने कोरोना (Coronavirus ) रुग्णांची संख्या वाढत होती. दिवसाला 50 ते 60 हजार नव्या रुग्णांची भर पडत होती. तसेच दिवसाला 800 ते 900 रुग्णांचा मृत्यू होत होता. मात्र, आता राज्यातील रुग्णांची संख्या कमी झाली असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे राज्यातील नागरिकांना आणि सरकारला दिलासा मिळाला आहे. गुरुवारी (दि.27) राज्यात 425 रुग्णांच्या मृत्यू नोंद झाली आहे. गेल्या आठवड्यापासून मृत्यूचे प्रमाण सातत्याने वाढत होते. मात्र, काल आणि आज मृत्यूची संख्या 500 च्या आत आल्याने थोडा दिलासा मिळाला आहे. बुधवारी (दि.26) 453 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली होती.

राज्यात गेल्या 24 तासामध्ये 21 हजार 273 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 34 हजार 370 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण 52 लाख 76 हजार 203 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 93.02 टक्के एवढे झाले आहे. राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 56 लाख 72 हजार 180 इतके झाले असून रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण 16.64 टक्के इतके आहे.

Sputnik V : ‘स्पुतनिक व्ही’च्या लस उत्पादनाला भारतात सुरुवात, प्रशासनाने जाहीर केली ‘वेळ’, ‘या’ हॉस्पिटलमध्ये मिळणार लस

 

आज राज्यात 425 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात रुग्ण मृत्यू होण्याचे प्रमाण 1.63 टक्के आहे. सध्या राज्यामध्ये 3 लाख 01 हजार 041 रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3 कोटी 40 लाख 86 हजार 110 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 56 लाख 72 हजार 180 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 22 लाख 18 हजार 278 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत. तर 19 हजार 996 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

Also Read this : 

मधाचे १५ मोठे फायदे, जे कदाचित माहिती नसतील तर…जाणून घ्या

Covid Somnia Cure : तुम्हाला कोरोना सोमनियाची समस्या तर नाही ना? जाणून घ्या लक्षणे आणि उपचार

‘या’ १० घरगुती उपायांनी आजार मिनिटात दूर पळून जातील, जाणून घ्या

Sachin Sawant : मराठा आरक्षणविरोधी लढ्याला भाजपची रसद; आरक्षणाला पाठिंबा हा त्यांचा दिखावा

मधुमेह, मानसिक आजार आणि हृद्यरोगाला दूर ठेवण्यासाठी करा हे “प्राणायम”