Coronavirus : दिलासादायक ! राज्यात गेल्या 24 तासात 33 हजार रुग्ण ‘कोरोना’मुक्त, रिकव्हरी रेट 93.88 %

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोना Coronavirus रुग्ण वाढीचा दर कमी झाला असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र रुग्णांची संख्या अधिक असल्याने राज्य सरकारने राज्यातील लॉकडाऊन 15 जून पर्यंत वाढवला आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढल्याने सक्रिय रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी झाला आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये नवीन रुग्णांचे प्रमाण घटले आहे. गेल्या 24 तासांत राज्यात 15 हजार 077 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर 33 हजार रुग्ण बरे झाले आहेत.

राज्यात गेल्या 24 तासामध्ये 33 हजार रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण 53 लाख 95 हजार 370 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 93.88 टक्के एवढा झाले आहे. राज्यातील कोरोना Coronavirus बाधित रुग्णांची संख्या 57 लाख 46 हजार 892 इतके झाले असून रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण 16.39 टक्के इतके आहे.

आज राज्यात 184 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात रुग्ण मृत्यू होण्याचे प्रमाण 1.66 टक्के आहे. सध्या राज्यामध्ये 2 लाख 53 हजार 367 रुग्ण ॲक्टिव्ह आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3 कोटी 50 लाख 55 हजार 054 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 57 लाख 46 हजार 892 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 18 लाख 70 हजार 304 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत. तर 10 हजार 743 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

Also Read This : 

दिलासादायक बातमी ! कोरोनाच्या केस होताहेत कमी, 12 आठवड्यानंतर मृत्यूंचे आकडेसुद्धा घसरले

‘या’ वयात सर्वात जास्त मिळतो शरीरसुखाचा आनंद, जाणून घ्या कालावधी

‘प्रेमा’ला विरोध झाल्याने चुलत बहिण-भावाने केली ‘आत्महत्या’

Pune : भरधाव दुचाकीनं रस्ता क्रॉस करणार्‍या 7 वर्षाच्या सियाला उडवलं; चिमुरडी गंभीर जखमी

रोहित पवारांचा चंद्रकांत पाटलांवर निशाणा, म्हणाले – ‘राज्याला केंद्राप्रमाणे कंपन्या विकून पैसे मिळत नाहीत’

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! मराठा विद्यार्थी आणि उमेदवारांना 10 टक्के EWS आरक्षणाचा लाभ मिळणार