Coronavirus : दिलासादायक ! राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 14,123 नवीन रुग्ण, तर 35,949 जणांना डिस्चार्ज

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात रुग्ण वाढीचा दर कमी झाला असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. राज्यात कोरोनाचा Coronavirus संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने 15 जून पर्यंत लॉकडाऊन वाढवला आहे. मागील काही दिवसांपासून राज्यात नवीन रुग्णांची संख्या कमी होत असून बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. यामुळे राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या वेगाने कमी होत आहे. गेल्या 24 तासांत राज्यात 14 हजार 123 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर 35 हजार 949 रुग्ण बरे झाले आहेत.

https://twitter.com/MahaGovtMic/status/1399737902045663233

राज्यात गेल्या 24 तासामध्ये 35 हजार 949 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण 54 लाख 31 हजार 319 कोरोनाबाधित Coronavirus रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 94.28 टक्के एवढे झाले आहे. राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 57 लाख 61 हजार 015 इतके झाले असून रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण 16.33 टक्के इतके आहे.

आज राज्यात 477 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात रुग्ण मृत्यू होण्याचे प्रमाण 1.67 टक्के आहे. सध्या राज्यामध्ये 2 लाख 30 हजार 681 रुग्ण ॲक्टिव्ह आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3 कोटी 52 लाख 77 हजार 653 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 57 लाख 61 हजार 015 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 17 लाख 68 हजार 119 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत. तर 9 हजार 315 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

READ ALSO THIS :

खुशखबर ! 18 ते 40 वर्षे वयोगटातील 10 वी पास उमेदवारांना पोस्टाच्या महाराष्ट्र विभागात नोकरीची सुवर्णसंधी, मुलाखतीविना 2428 पदांसाठी भरती; जाणून घ्या प्रक्रिया

 

लाल, गोड टरबूज ओळखण्याच्या अनोख्या युक्त्या; तात्काळ समजेल फळाच्या आतमधील परिस्थितीबाबत, जाणून घ्या

2013 च्या पोलीस उपनिरीक्षक अहर्ता परिक्षेतील 619 अंमलदारांना PSI पदी बढती

 

सकाळी उठल्यानंतर दररोज बडीशेपचे पाणी प्या, नक्की वजन होईल कमी; जाणून घ्या पाणी पिण्याची पध्दत