Coronavirus : दिलासादायक ! राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 13,659 नवीन रुग्ण, तर 21,776 जणांना डिस्चार्ज

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोना Coronavirus रुग्ण वाढीचा दर कमी झाला असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. राज्यात गेल्या 24 तासात 13 हजार 659 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर 21 हजार 776 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. याच दरम्यान राज्यात 300 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. राज्यात नवीन रुग्णांच्या तुलनेत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. सध्या राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.01 टक्के इतके झाले आहे.

राज्यात आजपर्यंत 58 लाख 19 हजार 224 रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी 55 लाख 28 हजार 834 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण 16.04 टक्के आहे. तर राज्यात कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण 1.71 टक्के एवढे आहे. सध्या राज्यामध्ये 14 लाख 052 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर 7 हजार 093 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात सध्या 1 लाख 88 हजार 027 रुग्ण ॲक्टिव्ह आहेत. त्यांच्यावर राज्यातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

12 वी पास उमेदवारांना राष्ट्रीय परीक्षा बोर्डात नोकरीची सुवर्णसंधी, जाणून घ्या प्रक्रिया

पुण्यातील कोरोनाची आकडेवारी
– दिवसभरात ३८० पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात ६४१ रुग्णांना डिस्चार्ज.
– पुण्यात करोनाबाधीत Coronavirus २८ रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील १०.
– ७०९ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
– पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या ४७१९५७.
– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- ४५६३.
– एकूण मृत्यू -८३७९.
– आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज ४५९०१५.
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ६९०९.

Mumbai Unlock : मुंबई महापालिकेकडून अनलॉकची नियमावली जाहीर, जाणून घ्या काय सुरू अन् काय बंद

पिंपरी चिंचवडमधील कोरोनाची आकडेवारी
– दिवसभरात २२४ पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात २३३ रुग्णांना डिस्चार्ज.
– शहरात करोनाबाधीत २५ रुग्णांच्या मृत्यूची नोंद. गेल्या २४ तासात ५ जणांचा मृत्यू
– शहरात एकूण कोरोना Coronavirus पॉझिटिव्ह रूग्णसंख्या २५१९६७.
– ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- ३००७.
– एकूण मृत्यू – ४१५१.
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज २४४८०९.
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ५०५८.

 

READ ALSO THIS :

 

तुमचा रंग सावळा आहे का ? याचे आरोग्यदायी फायदे जाणून व्हाल थक्क !

 

मराठा आरक्षण रद्द होण्यामागे ‘हे’ दोन प्रमुख कायदेशीर मुद्दे; जाणून घ्या

 

दोन सख्ख्या बहिणींची गळफास घेऊन आत्महत्या, प्रचंड खळबळ

 

25 वर्षांच्या हलीमाने एकाचवेळी दिला होता 9 मुलांना जन्म; एक महिन्यानंतर ‘ही’ आहे स्थिती