Coronavirus : दिलासादायक ! राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 12,557 नवीन रुग्ण, तर 14,433 जणांना डिस्चार्ज

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात आज (रविवार) 12 हजार 557 नवीन कोरोनाबाधित (Coronavirus) रुग्णांची नोंद झाली आहे. तर 14 हजार 433 कोरोनाबाधित (Coronavirus) रुग्णांना डिस्चार्ज (Discharge) देण्यात आला आहे. त्यामुळे कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 55 लाख 43 हजार 267 इतकी झाली आहे. तर राज्याचा रिकव्हरी रेट (Recovery rate) 95.05 टक्के झाला आहे. आज 233 कोरोना बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आजपर्यंत 1 लाख 130 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण 1.71 टक्के आहे.

Pimpri News | आरबीआयने केली सेवा विकास बँकेवर प्रशासकाची नियुक्ती, शहरात खळबळ

राज्यात सध्यात 1 लाख 85 हजार 527 सक्रीय रुग्ण (Active patient) आहेत. राज्यात आजपर्यंत 3 कोटी 65 लाख 08 हजार 967 प्रयोगशाळा चाचण्या (Laboratory tests) करण्यात आल्या आहेत. त्यापैकी 58 लाख 31 हजार 781 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. राज्यात सध्या 13 लाख 46 हजार 389 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर 6 हजार 426 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

पुणे शहरातील कोरोनाची आकडेवारी
– दिवसभरात २९७ पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात ५४९ रुग्णांना डिस्चार्ज.
– पुण्यात करोनाबाधीत २५ रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील ०९.
– ६६२ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
– पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या ४७२२५४.
– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- ४२९५.
– एकूण मृत्यू -८३९५.
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज ४५९५६४.
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ५८६८

पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाची आकडेवारी
– दिवसभरात २७० पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात २७३ रुग्णांना डिस्चार्ज.
– शहरात १९ रुग्णांच्या मृत्यूची नोंद. तर 24 तासात 2 जणांचा मृत्यू
– शहरात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या २५२२३७.
– शहरातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- २९९२.
– एकूण मृत्यू – ४१६३.
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज – २४५०८२.
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ५०८०.

Also Read This : 

Pune News : तळेगाव ढमढेरे येथे दिवसाढवळ्या खून, प्रचंड खळबळ

घरबसल्या ‘ओम’च्या जापाबरोबरच करा हा व्यायाम, फुफ्फुसांमध्ये येईल मजबुती; जाणून घ्या

भाजप कार्यालयाजवळ 51 क्रुड बॉम्ब आढळल्याने खळबळ !

केस गळतीच्या समस्येने त्रस्त आहात, तर कोरोना संक्रमणापासून दूर रहा; जाणून घ्या कारण?

प्रियकराने सैन्यात भरती होताच दिला धोका, लग्नाला नकार देताच तरुणीने काढली ‘वरात’