Coronavirus : दिलासादायक ! राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 10,219 नवीन रुग्ण, तर 21,081 जणांना डिस्चार्ज

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात आज 10 हजार 219 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. मागिल तीन महिन्यातील ही कमी रुग्ण संख्या आहे. यात दिलासादायक बाब म्हणजे बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या आज दुप्पट आहे. आज एकूण 21 हजार 081 इतके रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज कोरोना विषाणू (Coronavirus) मृतांची संख्या देखील कमी झाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. राज्यात गेल्या 24 तासात 154 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

राज्यात गेल्या 24 तासात 21 हजार 081 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात नवीन रुग्णांच्या तुलनेत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. सध्या राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.25 टक्के इतके झाले आहे. तर मृत्यूचे प्रमाण 1.72 टक्के इतके आहे. राज्यात आजपर्यंत 58 लाख 42 हजार रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी 55 लाख 64 हजार 348 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या राज्यामध्ये 12 लाख 47 हजार 033 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर 6 हजार 232 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात सध्या 1 लाख 74 हजार 320 रुग्ण अ‍ॅक्टिव्ह आहेत. त्यांच्यावर राज्यातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

पुणे कोरोना Coronavirus आकडेवारी

दिवसभरात १७७ पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.
दिवसभरात ५१४ रुग्णांना डिस्चार्ज.
पुण्यात करोनाबाधीत २६ रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील ११.
६२५ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या ४७२४३१.
पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- ३९४३.
एकूण मृत्यू -८४१०.
आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज ४६००७८.
आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ४७७५.

पिंपरी-चिंचवड कोरोना Coronavirus आकडेवारी

दिवसभरात २०६ पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात १२३ रुग्णांना डिस्चार्ज.
शहरात करोनाबाधीत १७ रुग्णांच्या मृत्यूची नोंद. गेल्या २४ तासात ०४ जणांचा मृत्यू
शहरात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या २५२४४३.
ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- ३०६५.
एकूण मृत्यू – ४१७३.
आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज २४५२०५.
आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ४५२५.

पुणे जिल्हा कोरोना Coronavirus आकडेवारी
पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 10 लाख 23 हजार 440 रुग्णांपैकी 9 लाख 88 हजार 299 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टिव्ह रुग्ण 18 हजार 62 आहे. कोरोनाबाधित एकूण 17 हजार 79 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 1.67 टक्के इतके आहे तर बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 96.57 टक्के आहे.

Coronavirus : पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 206 नवीन रुग्ण, 123 जणांना डिस्चार्ज

Coronavirus in Pune : दिलासादायक ! पुण्यात गेल्या 24 तासात 514 रूग्ण ‘कोरोना’मुक्त, नवीन रुग्णांची संख्या दोनशेच्या आत