Coronavirus : दिलासादायक ! राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 10,891 नवीन रुग्ण, तर 16,577 जणांना डिस्चार्ज

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात Coronavirus रुग्ण वाढीचा दर कमी झाला असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. राज्यात गेल्या 24 तासात 10 हजार 891 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर 16 हजार 577 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. याच दरम्यान राज्यात 295 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. राज्यात नवीन रुग्णांच्या तुलनेत Coronavirus रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. सध्या राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.35 टक्के इतके झाले आहे.

राज्यात आजपर्यंत 58 लाख 52 हजार 891 रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी 55 लाख 80 हजार 925 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण 15.86 टक्के आहे. तर राज्यात कोरोनामुळे Coronavirus मृत्यू होण्याचे प्रमाण 1.73 टक्के एवढे आहे. सध्या राज्यामध्ये 11 लाख 53 हजार 147 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर 6 हजार 225 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात सध्या 1 लाख 67 हजार 927 रुग्ण अ‍ॅक्टिव्ह आहेत. त्यांच्यावर राज्यातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

पुणे शहर कोरोना आकडेवारी

– दिवसभरात २९७ पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात ५२९ रुग्णांना डिस्चार्ज.
– पुण्यात करोनाबाधीत २४ रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील १२.
– ५८९ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
– पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या ४७२७२८.
– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- ३६९९.
– एकूण मृत्यू -८४२२.
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज ४६०६०७.
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ५०५२.

पुणे जिल्हा कोरोना आकडेवारी

पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 10 लाख 24 हजार 277 रुग्णांपैकी 9 लाख 90 हजार 18 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टिव्ह रुग्ण 17 हजार 143 आहे. कोरोनाबाधित एकूण 17 हजार 116 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 1.67 टक्के इतके आहे तर बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 96.66 टक्के आहे.

Also Read This : 

 

भाजप आमदाराचा सवाल; म्हणाले – ‘अजित पवार यांचा ‘गजनी’ झाला आहे का ?’

 

फाटलेल्या टाचा काही दिवसातच होतील ‘मुलायम’, वापरा हे DIY Foot Mask

 

Pune News | शहरी गरिब योजनेच्या ‘लाभार्थीं’च्या नावे शहरात मालमत्ता, 622 कार्डधारकांना नोटीस; शहरातील ‘त्या’ 11 मोठ्या रुग्णालयात यापुढे शहरी गरिब योजना नाही !