Coronavirus : राज्यात गेल्या 24 तासात 16,379 रुग्ण ‘कोरोना’मुक्त, रिकव्हरी रेट 95.45%

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात मागील काही दिवसांपासून दैनंदिन रुग्णांपेक्षा (Daily) बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आढळत आहे. राज्याचा रिकव्हरी रेट ((Recovery rate) वाढताना दिसत आहे. गेल्या 24 तासात राज्यात 16 हजार 379 रुग्ण  कोरोनामुक्त (Corona ) झाले आहेत. राज्यात  रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.45 टक्के इतके झाले आहे. तर 10 हजार 989 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. याशिवाय 261 कोरोनाबाधित Coronavirus रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आज रोजी एकूण 1 लाख 61 हजार 864 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

राज्यात आजपर्यंत एकूण 55 लाख 97 हजार 304 कोरोनाबाधित (Coronavirus ) रुग्ण बरे झाले आहेत. तर राज्यात आजपर्यंत 1 लाख 1 हजार 833 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
राज्याचा मृत्यूदर 1.74 टक्के एवढा झाला आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3 कोटी 71 लाख 28 हजार 093 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी (laboratory samples) 58 लाख 63 हजार 880 नमुने पॉझिटिव्ह (Positive) आले आहेत. रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण 15.79 टक्के आहे.
सध्या राज्यात 11 लाख 35 हजार 347 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर 6 हजार 494 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

पुण्यात ४५६ रुग्णांना डिस्चार्ज
दिवसभरात ३११ पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.
दिवसभरात ४५६ रुग्णांना डिस्चार्ज.
पुण्यात करोनाबाधीत २३ रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील ०८.
५६३ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या ४७३०३९.
पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- ३५३९.
एकूण मृत्यू -८४३७.
आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज ४६१०६३.
आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ६७५८.

पिंपरी चिंचवडमध्ये ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या घटली
दिवसभरात 314 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.
दिवसभरात 300 रुग्णांना डिस्चार्ज.
शहरात कोरोनाबाधित 18 रुग्णांच्या मृत्यूची नोंद. गेल्या २४ तासात ०5 जणांचा मृत्यू
शहरात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या २५२९७८.
ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- २९४५.
एकूण मृत्यू – ४१९३.
आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज २४५८४०.
आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ४९२५.

पुणे जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले
पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 10 लाख 25 हजार 448 रुग्णांपैकी 9 लाख 92 हजार 471 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टिव्ह रुग्ण 15 हजार 826 आहे. कोरोनाबाधित एकूण 17 हजार 151 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 1.67 टक्के इतके आहे तर बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 96.78 टक्के आहे.

Also Read This : 

 

खासगी बस अन् टेम्पोचा भीषण अपघात; 17 जणांचा मृत्यू, चौघे गंभीर जखमी

 

Health News : जांभळाचे ‘या’ वेळी करावे सेवन, ‘हे’ 5 फायदे जाणून व्हाल हैराण

 

Mansoon in Mumbai : मुंबईत मॉन्सून दाखल ! कोकणासह मायानगरीत मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत