Coronavirus : दिलासादायक ! राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 10,697 नवीन रुग्ण, तर 14,910 जणांना डिस्चार्ज

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात (Coronavirus ) रुग्ण वाढीचा दर कमी (Patient growth) झाला असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (patient recover) वाढले आहे. राज्यात गेल्या 24 तासात 10 हजार 697 नवीन रुग्णांचे (new patient) निदान झाले आहे. तर 14 हजार 910 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. याच दरम्यान राज्यात 360 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. राज्यात नवीन रुग्णांच्या तुलनेत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. सध्या राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery rate) 95.48 टक्के इतके झाले आहे.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

राज्यात आजपर्यंत 58 लाख 98 हजार 550 रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी 56 लाख 31 हजार 767 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण 15.59 टक्के आहे. तर राज्यात कोरोनामुळे Coronavirus मृत्यू होण्याचे प्रमाण 1.84 टक्के एवढे आहे. सध्या राज्यामध्ये 09 लाख 63 हजार 227 लोक होम क्वारंटाईनमध्ये Home quarantine आहेत. तर 5 हजार 807 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात सध्या 1 लाख 55 हजार 474 रुग्ण ॲक्टिव्ह (active) आहेत. त्यांच्यावर राज्यातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

पुण्यातील (Pune) कोरोनाची Coronavirus आकडेवारी
दिवसभरात ३३१ पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.
दिवसभरात ४५९ रुग्णांना डिस्चार्ज.
पुण्यात करोनाबाधीत २० रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील १०.
५१७ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या ४७३८७०.
पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- ३१८२.
एकूण मृत्यू -८४६६.
आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज ४६२२२२.
आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ५८२९.

पिंपरी चिंचवडमधील कोरोनाची Coronavirus आकडेवारी
दिवसभरात २४० पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.
दिवसभरात ४४२ रुग्णांना डिस्चार्ज.
शहरात करोनाबाधीत १२ रुग्णांच्या मृत्यूची नोंद. गेल्या २४ तासात ३ जणांचा मृत्यू
शहरात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या २५३७१३.
ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- २३२०.
एकूण मृत्यू – ४२१७.
आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज २४७१७६.
आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ४६०६.

पुणे जिल्ह्यातील रिकव्हरी रेट 96.97 रुग्ण
पुणे जिल्ह्यातील (Pune District) कोरोना बाधीत एकूण 10 लाख 29 हजार 442 रुग्णांपैकी 9 लाख 98 हजार 215 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टिव्ह रुग्ण 13 हजार 926 आहे. कोरोनाबाधित एकूण 17 हजार 301 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 1.68 टक्के इतके आहे तर बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 96.97 टक्के आहे.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

Web Title : Maharashtra State Coronavirus Update

हे देखील वाचा

Pune News | नवले ब्रिजजवळ भरधाव वाहनाने दिलेल्या धडकेत 43 वर्षीय सिव्हिल इंजिनिअर सरदेशपांडे यांचा मृत्यू

Coronavirus : दिलासादायक ! पिंपरी-चिंचवड शहरात आज 442 जण ‘कोरोना’मुक्त, 240 नवीन रुग्णांची नोंद

Pune Corona : दिलासादायक ! पुणे शहरात गेल्या 24 तासात 459 रुग्ण ‘कोरोना’मुक्त

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा