Coronavirus : राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 10,442 नवीन रुग्ण, तर 7,504 जणांना डिस्चार्ज

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात (state) आज 10,442 नवीन कोरोना (Coronavirus) बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर आज 7,504 कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज (patient recover) देण्यात आला आहे. आज 483 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आज आकडेवारीत रोजच्या रुग्ण वाढीपेक्षा (new patient) बरे होऊन घरी परतणाऱ्या रुग्णांची संख्या कमी नोंदवण्यात आली आहे. राज्यात एकूण 1 लाख 55 हजार 588 ॲक्टिव्ह active रुग्ण आहेत.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

आजपर्यंत 56 लाख 39 हजार 271 कोरोना बाधित (Coronavirus) रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 95.44 टक्के एवढा झाला आहे. राज्यात आजपर्यंत 1 लाख 11 हजार 104 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.88 टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3 कोटी 80 लाख 46 हजार 590 प्रयोगशाळा नमुन्यापैकी 59 लाख 08 हजार 992 (15.53%) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 9 लाख 62 हजार 134 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये Home quarantine आहेत. तर 6 हजार 160 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

भाजप नेते अतुल भातखळकरांची बोचरी टीका, म्हणाले – ‘नाना पटोलेंना मुख्यमंत्री व्हावसं वाटतंय, पण…’

पुण्यातील (Pune) कोरोनाची आकडेवारी
दिवसभरात २४२ पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.
दिवसभरात ३८८ रुग्णांना डिस्चार्ज.
पुण्यात कोरोनाबाधीत (Coronavirus) १६ रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील ०७.
५११ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या ४७४११३.
पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- ३०२७.
एकूण मृत्यू -८४७५.
आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज ४६२६१०.
आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ५५३२.

पिंपरी चिंचवडमधील (PCMC) कोरोनाची आकडेवारी
दिवसभरात २१९ पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.
दिवसभरात ४२६ रुग्णांना डिस्चार्ज.
शहरात कोरोनाबाधीत ०९ रुग्णांच्या मृत्यूची नोंद. गेल्या २४ तासात ०२ जणांचा मृत्यू
शहरात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या २५३९३२.
ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- २१०७.
एकूण मृत्यू – ४२२३.
आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज २४७६०२.
आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ४३९४.

पुणे जिल्ह्याचा रिकव्हरी रेट वाढला
पुणे जिल्ह्यातील (Pune District) कोरोना बाधीत (Coronavirus) एकूण 10 लाख 30 हजार 863 रुग्णांपैकी 9 लाख 99 हजार 826 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टिव्ह रुग्ण 13 हजार 710 आहे. कोरोनाबाधित एकूण 17 हजार 327 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 1.68 टक्के इतके आहे तर बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 96.99 टक्के आहे.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

Web Title : Maharashtra State Coronavirus Update

 

हे देखील वाचा

‘या’ 5 वस्तूंच्या अति सेवनाने कमजोर होते इम्यून सिस्टम, बाळगा सावधगिरी

पुणे शहर काँग्रेस तर्फे छत्री मोफत दुरुस्ती उपक्रम

Pune Crime News | लग्नाची वरात पहात असलेल्या तरुणावर सुरीने वार, पूर्ववैमनस्यातून जीवे मारण्याचा प्रयत्न

Vijay Wadettiwar | राज्यात पुन्हा कठोर निर्बंध?, मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांचं पुण्यात मोठं विधान

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा