Coronavirus : दिलासादायक ! राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 10,107 नवीन रुग्ण, तर 10,567 जणांना डिस्चार्ज

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात आज (बुधवार) 10 हजार 107 नवीन कोरोनाबाधित (Coronavirus) रुग्णांची नोंद झाली आहे. तर 10 हजार 567 कोरोनाबाधित रुग्णांना डिस्चार्ज (Discharge) देण्यात आला आहे. त्यामुळे कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 56 लाख 79 हजार 746 इतकी झाली आहे. तर राज्याचा रिकव्हरी रेट (Recovery rate) 95.7 टक्के झाला आहे. आज 237 कोरोना बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आजपर्यंत 1 लाख 15 हजार 390 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण (Case Fatality Rate) 1.94 टक्के आहे.

राज्यात सध्यात 1 लाख 15 हजार 390 सक्रीय रुग्ण (Active patient) आहेत. राज्यात आजपर्यंत 3 कोटी 86 लाख 41 हजार 639 प्रयोगशाळा चाचण्या (Laboratory tests) करण्यात आल्या आहेत. त्यापैकी 59 लाख 34 हजार 746 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. राज्यात सध्या 08 लाख 78 हजार 781 लोक होम क्वारंटाईनमध्ये (home quarantine) आहेत. तर 5 हजार 401 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये (institutional quarantine) आहेत.

पुणे शहरातील (Pune City) कोरोनाची आकडेवारी
– दिवसभरात 295 पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात 321 रुग्णांना डिस्चार्ज.
– पुण्यात करोनाबाधीत 20 रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील 11.
– 451 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
– पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 474840.
– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 2738.
– एकूण मृत्यू -8501.
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज 463601.
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 5958.

पिंपरी-चिंचवड (PCMC) शहरातील कोरोनाची आकडेवारी

– दिवसभरात 237 पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात 476 रुग्णांना डिस्चार्ज.
– शहरात 09 रुग्णांच्या मृत्यूची नोंद. तर 24 तासात 02 जणांचा मृत्यू
– शहरात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 254526.
– शहरातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 1276.
– एकूण मृत्यू – 4235.
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज – 249015.
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी – 4693.

पुणे जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.22 %
पुणे जिल्ह्यातील (Pune district) कोरोना (Corona) बाधीत एकूण 10 लाख 34 हजार 59 रुग्णांपैकी 10 लाख 5 हजार 327 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टिव्ह रुग्ण (Active patient) 11 हजार 347 आहे. कोरोना बाधित एकूण 17 हजार 385 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 1.68 टक्के इतके आहे तर बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 97.22 टक्के आहे.

Wab Title :- Maharashtra State Coronavirus Update

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Karnala Bank Scam | कर्नाळा बँक घोटाळा प्रकरणी शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांना ED कडून अटक

MP Chhatrapati Sambhaji Raje । संभाजीराजेंचा चंद्रकांत पाटलांवर पलटवार; म्हणाले – ‘खासदारकी मागायला मी भाजपाकडे गेलो नव्हतो’

Vaccination Scam | मुंबईतील हाऊसिंग सोसायटीत बोगस लसीकरण; 390 जणांकडून घेतले प्रत्येकी 1260 रुपये