Coronavirus | राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 9,974 नवीन रुग्ण, तर 8,562 जणांना डिस्चार्ज

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama online) – राज्यात आज (रविवार) 09 हजार 974 नवीन कोरोनाबाधित (Coronavirus) रुग्णांची नोंद झाली आहे. तर 08 हजार 562 कोरोनाबाधित रुग्णांना डिस्चार्ज (Discharge) देण्यात आला आहे. त्यामुळे कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 57 लाख 90 हजार 113 इतकी झाली आहे. तर राज्याचा रिकव्हरी रेट (Recovery rate) 95.91 टक्के झाला आहे. आज 143 कोरोना बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आजपर्यंत 1 लाख 21 हजार 286 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण (Case Fatality Rate) 2.0 टक्के आहे. Maharashtra State Coronavirus Update

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

राज्यात सध्यात 1 लाख 22 हजार 252 सक्रीय रुग्ण (Active patient) आहेत. राज्यात आजपर्यंत 4 कोटी 10 लाख 42 हजार 198 प्रयोगशाळा चाचण्या (Laboratory tests) करण्यात आल्या आहेत. त्यापैकी 60 लाख 36 हजार 821 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. राज्यात सध्या 06 लाख 19 हजार 168 लोक होम क्वारंटाईनमध्ये (home quarantine) आहेत. तर 4 हजार 240 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये (institutional quarantine) आहेत.

पुणे शहरातील (Pune City) कोरोनाची आकडेवारी

– दिवसभरात 274 पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात 257 रुग्णांना डिस्चार्ज.
– पुण्यात करोनाबाधीत 17 रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील 11.
– 296 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
– पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 477584.
– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 2419.
– एकूण मृत्यू – 8571.
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज – 466594.
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 5271.

पिंपरी-चिंचवड (PCMC) शहरातील कोरोनाची आकडेवारी

– दिवसभरात 406 पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात 414 रुग्णांना डिस्चार्ज.
– शहरात 03 रुग्णांच्या मृत्यूची नोंद. तर 24 तासात 02 जणांचा मृत्यू
– शहरात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 257103.
– शहरातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 1296.
– एकूण मृत्यू – 4276.
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज – 251531.
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी – 6090.

पुणे जिल्ह्यातील रिकव्हरी रेट 97.42 रुग्ण

पुणे जिल्ह्यातील (Pune district) कोरोना बाधीत एकूण 10 लाख 46 हजार 677 रुग्णांपैकी 10 लाख 19 हजार 654 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टिव्ह रुग्ण Active patient 9 हजार 348 आहे. कोरोनाबाधित एकूण 17 हजार 675 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 1.69 टक्के इतके आहे तर बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण (Recovery rate) 97.42 टक्के आहे.

Web Titel :- Maharashtra State Coronavirus Update

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

…म्हणून प्रताप सरनाईक एवढे हतबल झाले; खा. संजय राऊत यांनी सांगितले

2 ड्रोनच्या सहाय्याने जम्मू विमानतळावर बॉम्बहल्ला ! व्हाईस एअर चीफ मार्शल एच. एस. अरोरा जम्मूला रवाना

पहिल्यांदाच शनिवार, रविवारी लागोपाठ पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ; जाणून घ्या आजचे दर