Coronavirus : राज्यात दिवसभरात ‘कोरोना’चे 2752 नवीन रुग्ण, 45 जणांचा मृत्यू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील कोरोनाचा संसर्ग अद्यापही वाढतच आहे. रविवारी (दि.24) दिवसभरात 2 हजार 752 नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर कोरोनातून बरे झालेल्या एकूण 1 हजार 743 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत 19 लाख 12 हजार 264 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. या आकडेवारी नुसार राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.18 टक्के इतके झाले आहे. अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या आता 20 लाख 09 हजार 106 वर पोहचली आहे. सध्या राज्यात 44 हजार 831 ॲक्टिव्ह केसेस आहेत. राज्यात सर्वाधिक ॲक्टिव्ह रुग्ण पुणे जिल्ह्यात असून पुणे जिल्ह्यात असून पुणे जिल्ह्यामध्ये 12 हजार 002 ॲक्टिव्ह केसेस आहेत. पुण्यानंतर ठाण्यात 7 हजार 741 तर मुंबईत 6 हजार 328 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

राज्यात आज 45 रुग्णांचा मृत्यू झाला असून राज्यात आजपर्यंत 50 हजार 785 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील मृत्यू दर 2.53 इतका झाला आहे. राज्यात सर्वाधिक मृत्यू मुंबईमध्ये झाले आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 1 कोटी 42 लाख 7 हजार 595 प्रयोगशाळा नमुन्यापैकी 20 लाख 09 हजार 106 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण 14.14 टक्के आहे. सध्या राज्यात 2 लाख 8 हजार 993 होम क्वारंटाईन आहेत.