Coronavirus : राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 6,727 नवीन रुग्ण, तर 10,812 जणांना डिस्चार्ज

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama online) – राज्यात आज (सोमवार) दिवसभरात नव्या रुग्णांच्या (new patients) संख्येत कालच्या तुलनेत मोठी घट झाली आहे. हा राज्यासाठी मोठा दिलासा आहे. राज्यात गेल्या 24 तासात 06 हजार 470 नवीन कोरोनाबाधित (Coronavirus) रुग्णांची नोंद झाली आहे. तर 10 हजार 812 कोरोनाबाधित रुग्णांना डिस्चार्ज (Discharge) देण्यात आला आहे. त्यामुळे कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 58 लाख 925 इतकी झाली आहे. तर राज्याचा रिकव्हरी रेट (Recovery rate) 95.99 टक्के झाला आहे. आज 101 कोरोना बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आजपर्यंत 1 लाख 21 हजार 573 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण (Case Fatality Rate) 2.01 टक्के आहे.

राज्यात सध्या 1 लाख 17 हजार 874 सक्रीय रुग्ण (Active patient) आहेत. राज्यात आजपर्यंत 4 कोटी 12 लाख 08 हजार 361 प्रयोगशाळा चाचण्या (Laboratory tests) करण्यात आल्या आहेत. त्यापैकी 60 लाख 43 हजार 548 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह (Positive report) आला आहे. राज्यात सध्या 06 लाख 15 हजार 839 लोक होम क्वारंटाईनमध्ये (home quarantine) आहेत. तर 4 हजार 245 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये (institutional quarantine) आहेत.

पुणे शहरातील (Pune City) कोरोनाची आकडेवारी

– दिवसभरात 157 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात 280 रुग्णांना डिस्चार्ज.
– पुण्यात कोरोना बाधित 19 रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील 12.
– 291 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
– पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 477741.
– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 2289.
– एकूण मृत्यू – 8578.
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज – 466874.
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 4176.

पिंपरी-चिंचवड (PCMC) शहरातील कोरोनाची आकडेवारी

– दिवसभरात 185 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात 279 रुग्णांना डिस्चार्ज.
– शहरात 05 रुग्णांच्या मृत्यूची नोंद. तर 24 तासात 03 जणांचा मृत्यू
– शहरात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 257288.
– शहरातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 1199.
– एकूण मृत्यू – 4276.
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज – 251810.
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी – 4708.

Advt.

पुणे जिल्ह्यातील रिकव्हरी रेट 97.39 रुग्ण
पुणे जिल्ह्यातील (Pune district) कोरोना बाधीत एकूण 10 लाख 47 हजार 980 रुग्णांपैकी 10 लाख 20 हजार 619 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टिव्ह रुग्ण Active patient 9 हजार 634 आहे. कोरोनाबाधित एकूण 17 हजार 727 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 1.69 टक्के इतके आहे तर बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण (Recovery rate) 97.39 टक्के आहे.

Web Titel :- Maharashtra State Coronavirus Update

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

नवी मुंबईतील भाजप नगरसेविका संगीत म्हात्रे यांच्यावर पतीवर प्राणघातक हल्ला; कोयत्याने केले सपासप वार

पुलवामात दहशतवादी हल्ला ! विशेष पोलीस अधिकार्‍याच्या घरात शिरुन केली हत्या, पत्नी, मुलीचाही मृत्यु

Twitter ला मोठा झटका, तक्रार अधिकार्‍याने दिला राजीनामा; काही दिवसापूर्वीच झाली होती नियुक्ती

Railway Ticket Booking | आता रेल्वे तिकिट बुक करण्यासाठी सुद्धा आधार पॅन लिंक करणे होणार आवश्यक