Coronavirus : राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 8,085 नवीन रुग्ण, तर 8,623 जणांना डिस्चार्ज, रिकव्हरी रेट 96 %

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – राज्यात गेल्या 24 तासात एकूण 8 हजार 085 नव्या कोरोना बाधित रुग्णांचे निदान (Maharashtra Registered 8085 New Cases) झाले आहे. तर आज एकूण 8 हजार 623 इतके रुग्ण बरे (patients recover) होऊन घरी गेले आहेत. तसेच आज दिवसभरात 231 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू (death) झाला आहे. Maharashtra State Coronavirus Update

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

आजपर्यंत 1 लाख 21 हजार 804 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण (Case Fatality Rate) 2.01 टक्के आहे. तर कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 58 लाख 09 हजार 548 इतकी झाली आहे. राज्यात सध्या 1 लाख 17 हजार 098 सक्रीय रुग्ण (Active patient) आहेत. राज्यात आजपर्यंत 4 कोटी 13 लाख 98 हजार 501 प्रयोगशाळा चाचण्या (Laboratory tests) करण्यात आल्या आहेत. त्यापैकी 60 लाख 51 हजार 633 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह (Positive report) आला आहे. राज्यात सध्या 06 लाख 21 हजार 377 लोक होम क्वारंटाईनमध्ये (home quarantine) आहेत. तर 3 हजार 584 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये (institutional quarantine) आहेत.

पुणे शहरातील (Pune City) कोरोनाची आकडेवारी
– दिवसभरात 268 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात 232 रुग्णांना डिस्चार्ज.
– पुण्यात कोरोना बाधित 14 रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील 09.
– 288 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
– पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 478009.
– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 2320.
– एकूण मृत्यू – 8583.
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज – 467106.
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी – 5362.

पिंपरी-चिंचवड (PCMC) शहरातील कोरोनाची आकडेवारी
– दिवसभरात 218 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात 275 रुग्णांना डिस्चार्ज.
– शहरात 06 रुग्णांच्या मृत्यूची नोंद. तर 24 तासात 01 जणाचा मृत्यू
– शहरात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 257506.
– शहरातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 1138.
– एकूण मृत्यू – 4283.
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज – 252085.
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी – 3793.

पुणे जिल्ह्यातील 9592 ॲक्टिव्ह रुग्ण
पुणे जिल्ह्यातील (Pune district) कोरोना बाधीत एकूण 10 लाख 48 हजार 708 रुग्णांपैकी 10 लाख 21 हजार 374 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टिव्ह रुग्ण Active patient 9 हजार 592 आहे. कोरोनाबाधित एकूण 17 हजार 742 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 1.69 टक्के इतके आहे तर बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण (Recovery rate) 97.39 टक्के आहे.

Web Titel :  Maharashtra State Coronavirus Update

Maratha Reservation । तर.. मग सरकार कोणत्या बाबतीत सकारात्मक?, चंद्रकांत पाटलांचा ठाकरे सरकारला सवाल

Pune Crime News | सायबर भामट्यांची फास्ट टॅगवर वक्रदृष्टी, करताहेत ‘हा’ उद्योग