Coronavirus | राज्यात गेल्या 24 तासात 7,467 ‘कोरोना’मुक्त, 6,959 नवीन रुग्ण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – Coronavirus | राज्यात दैनंदिन कोरोना (Maharashtra Corona Cases) बाधित रुग्णांची संख्या काही दिवसांपासून सात हजारांच्या आत येऊ लागली आहे. राज्यात गेल्या 24 तासात 6 हजार 959 नवीन कोरोना बाधित (Corona-infected patient) रुग्णांचे निदान झाले आहे. तर 7 हजार 467 इतके रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तसेच आज दिवसभरात 225 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील मृत्यूदर (Case Fatality Rate) 2.1 टक्के इतका झाला आहे.

 

 

आतापर्यंत 60 लाख 90 हजार 786 रुग्णांनी कोरोनावर (Coronavirus) मात केली आहे. राज्याचा रिकव्हरी रेट (Recovery rate) 96.62 टक्क्यावर गेला आहे. राज्यात आजपर्यंत 1 लाख 32 हजार 791 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात 76 हजार 755 रुग्णांवर उपचार सुरु (Active patient) आहेत. राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4 कोटी 79 लाख 67 हजार 609 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 63 लाख 03 हजार 715 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

पुणे शहरातील (Pune City) कोरोनाची आकडेवारी

– दिवसभरात 260 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात 335 रुग्णांना डिस्चार्ज.
– पुण्यात कोरोना बाधित 14 रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील 06.
– 220 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
– पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या – 487165.
– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 2496.
– एकूण मृत्यू – 8767.
– आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज – 475902.
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 8450.

पिंपरी-चिंचवड (PCMC) शहरातील कोरोनाची आकडेवारी

– दिवसभरात 175 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात 129 रुग्णांना डिस्चार्ज.
– शहरात 02 रुग्णांच्या मृत्यूची नोंद. तर 24 तासात एकाही मृत्यूची नोंद नाही
– शहरात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या – 264536.
– शहरातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 930.
– एकूण मृत्यू – 4344.
– आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज – 259262.
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी – 5434.

Web Title : Maharashtra State Coronavirus Update

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Sanjay Raut | संजय राऊतांचा केंद्रीय मंत्री नारायण राणेंना टोला, म्हणाले…

Crime News | अनोळखी महिलेला तरुणानं मारली घट्ट मिठी; दादर रेल्वे स्टेशनवरील विचित्र प्रकार समोर

Monsoon And Covid | ‘कोरोना’ आणि ‘मान्सून’संबंधी आजार कसे ओळखाल? जाणून घ्या तज्ज्ञांचं म्हणणं