Maharashtra Coronavirus | राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 4,654 नवीन रुग्ण, 3,301 जणांना डिस्चार्ज

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – Maharashtra Coronavirus | राज्यात गेल्या 24 तासात एकूण 4 हजार 654 नव्या कोरोना बाधित रुग्णांचे निदान (Corona New Cases) झाले आहे. तसेच आज नव्या रुग्णांच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या घटली आहे. आज एकूण 3 हजार 301 इतके रुग्ण बरे (Coronavirus patients recover) झाले आहेत. तसेच आज एकूण 170 रुग्णांचा मृत्यू (Death) झाला आहे, राज्याच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे. (Maharashtra State Coronavirus Update)

आजच्या 170 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूबरोबरच राज्यातील मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. याशिवाय राज्यात आतापर्यंत एकूण 62 लाख 55 हजार 451 रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.02 टक्के एवढा झाला आहे. राज्यातील अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची (Active patient) संख्या 51 हजार 574 इतकी झाली आहे. राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5 कोटी 32 लाख 56 हजार 024 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 64 लाख 47 हजार 442 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. तर आजपर्यंत राज्यात 1 लाख 36 हजार 900 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

 

पुणे शहरातील (Pune City) कोरोनाची आकडेवारी

– दिवसभरात 257 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात 163 रुग्णांना डिस्चार्ज.
– पुण्यात कोरोना बाधित 15 रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील 10.
– 206 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
– पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या – 494724.
– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 2311.
– एकूण मृत्यू – 8907.
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज – 483506.
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 9685.

पिंपरी-चिंचवड (PCMC) शहरातील कोरोनाची आकडेवारी

– दिवसभरात 173 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात 116 रुग्णांना डिस्चार्ज.
– शहरात 02 रुग्णांच्या मृत्यूची नोंद. तर 24 तासात एकही मृत्यू झालेला नाही
– शहरात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या – 269002.
– शहरातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 1405.
– एकूण मृत्यू – 4393.
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज – 263464.
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी – 5481.

 

Web Title : Maharashtra State Coronavirus Update

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Biodiesel | आता शिल्लक खाद्यतेलाद्वारे तयार बायो-डिझेलवर धावणार तुमची कार, डिझेलपेक्षा 40 टक्के ‘स्वस्त’, जाणून घ्या

Pune News | मुलीचा कोरोनामुळे मृत्यू, आता आईचा शॉक लागून मृत्यू; कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर

Mumbai Police | वस्तू गहाळ झाल्याची पोलीस ठाण्यात तक्रार देताना अ‍ॅफिडेव्हिटची गरज नाही, मागणी केल्यास होणार कारवाई