Maharashtra Coronavirus | राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 3,741 नवीन रुग्ण, तर 4,696 जणांना डिस्चार्ज

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन Maharashtra Coronavirus | राज्यात आज (सोमवार) 04 हजार 696 नवीन कोरोनाबाधित (Maharashtra Coronavirus) रुग्णांची नोंद झाली आहे. तर 03 हजार 741 कोरोनाबाधित रुग्णांना डिस्चार्ज (Discharge) देण्यात आला आहे. त्यामुळे कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 62 लाख 68 हजार 112 इतकी झाली आहे. तर राज्याचा रिकव्हरी रेट (Recovery rate) 97.02 टक्के झाला आहे. आज 52 कोरोना बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यात कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण (Case Fatality Rate) 2.12 टक्के इतका झाला आहे.

राज्यात सध्या 51 हजार 834 सक्रीय रुग्ण (Active patient) आहेत. राज्यात आजपर्यंत 5 कोटी 38 लाख 12 हजार 827 प्रयोगशाळा चाचण्या (Laboratory tests) करण्यात आल्या आहेत. त्यापैकी 64 लाख 60 हजार 680 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. राज्यात सध्या 02 लाख 88 हजार 489 लोक होम क्वारंटाईनमध्ये (home quarantine) आहेत. तर 2 हजार 299 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये (institutional quarantine) आहेत.

 

 

पुणे शहरातील (Pune City) कोरोनाची आकडेवारी

– दिवसभरात 128 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात 171 रुग्णांना डिस्चार्ज.
– पुण्यात कोरोना बाधित 17 रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील 12.
– 198 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
– पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या – 495343.
– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या – 2234.
– एकूण मृत्यू – 8922.
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज – 484187.
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी – 6802.

पिंपरी-चिंचवड (PCMC) शहरातील कोरोनाची आकडेवारी

– दिवसभरात 84 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात 227 रुग्णांना डिस्चार्ज.
– शहरात 03 रुग्णांच्या मृत्यूची नोंद. तर 24 तासात एका रुग्णाचा मृत्यू झाला
– शहरात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या – 269419.
– शहरातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 1294.
– एकूण मृत्यू – 4397.
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज – 263988.
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी – 5104.

पुणे जिल्ह्याचा रिकव्हरी रेट 97.48 %

पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 11 लाख 13 हजार 781 रुग्णांपैकी 10 लाख 85 हजार 708 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टिव्ह रुग्ण 9 हजार 516 आहे. कोरोनाबाधित एकूण 18 हजार 557 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 1.67 टक्के इतके आहे तर बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 97.48 टक्के आहे.

 

Web Title : Maharashtra State Coronavirus Update

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Police | व.पो.नि. डांगे यांची नगरला बदली, कोथरूडच्या वरिष्ठ निरीक्षकपदी गुन्हे शाखेतील ‘या’ अधिकाऱ्याची नियुक्ती

Pune News | ‘नाट्यगृह लवकर सुरु करा’, पुण्यात कलाकारांची महाआरती (व्हिडीओ)

Nutrition Reasons | का लागते वारंवार भूक? ‘ही’ 9 कारणे असू शकतात जबाबदार; जाणून घ्या