Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात 3,685 जण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  राज्यातील कोरोना संसर्गाची (Coronavirus in Maharashtra) दुसरी लाट अद्याप पूर्णपणे ओसरलेली नाही. शिवाय, तिसऱ्या लाटेची शक्यता देखील वर्तवली जात आहे. राज्यात अजुनही दररोज नवीन कोरोनाबाधित (Coronavirus in Maharashtra) आढळून येत असून, कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यू संख्येतही भर पडतच आहे. तर दररोज आढळणारी कोरोनाबाधितांची संख्या ही कोरोनातून बरे (Recover Patient) होत असलेल्यांच्या तुलनेत कधी कमी तर कधी जास्त आढळून येत आहे. राज्यात आज दिवसभरात 3 हजार 685 रुग्ण बरे झाले आहेत. तर 3 हजार 530 नवीन कोरोनाबाधित आढळले आहे.

राज्यात गेल्या 24 तासात 52 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
राज्यात आजपर्यंत 1 लाख 38 हजार 221 कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
सध्या राज्यातील मृत्यूदर (Case Fatality Rate) 2.12 टक्के एवढा आहे.
राज्यात आजपर्यंत 63 लाख 12 हजार 706 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 97.06 टक्के एवढे झाले आहे.

सध्या राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 65 लाख 4 हजार 147 इतकी आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5 कोटी 62 लाख 25 हजार 304 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 65 लाख 4 हजार 147 (11.57 टक्के) नमुने पॉझिटिव्ह (positive patients) आले आहेत.
सध्या राज्यात 2 लाख 96 हजार 176 व्यक्ती गृहविलगिकरणात (home quarantine) आहेत.
तर, हजार 875 व्यक्ती संस्थात्मक विलगिकरणात (institutional quarantine) आहेत.
राज्यात आज रोजी एकूण 49 हजार 671अ‍ॅक्टिव्ह रूग्ण (Active Cases) आहेत.

 

Web Title : Maharashtra State Coronavirus Update

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

Shocking ! 10 व्या मजल्यावरून पडून मृत्युमुखी पडली जुळी मुले, Live Streaming मध्ये रमलेल्या आईला ओरडण्याचा आवाजही आला नाही

Maharashtra Rains | राज्यभरात ‘धो-धो’ पावसाची शक्यता, आगामी 2 दिवस पुण्यात ‘हाय अलर्ट’

सुखवार्ता ! SBI बँकेनं केली व्याज दरात कपात; आता होम, ऑटो अन् पर्सनल लोनसह इतर कर्जावरील EMI भरावा लागेल कमी