Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात 80 रुग्णांचा मृत्यू, 3,841 जण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोना (Coronavirus in Maharashtra) संसर्गाची दुसरी लाट अद्याप पूर्णपणे ओसरलेली नाही. शिवाय तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आजुनही दररोज नवीन कोरोनाबाधित (New Cases) आढळून येत असून कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यू संख्येतही भर पडतच आहे. तर दररोज आढळणारी कोरोना बाधित रुग्णांची (Coronavirus in Maharashtra) संख्या ही कोरोनातून बरे होत असलेल्यांच्या तुलनेत कधी कमी तर कधी जास्त आढळून येत आहेत. राज्यात आज दिवसभरात 3 हजार 841 रुग्ण कोरोनामुक्त (Recover Patient) झाले आहेत. तर 3 हजार 391 कोरोनाबाधित आढळून आले आहे.

राज्यात गेल्या 24 तासात 80 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत राज्यात 1 लाख 38 हजार 469 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील मृत्यू दर (Case Fatality Rate) 2.12 टक्के एवढा आहे. राज्यात आजपर्यंत 63 लाख 28 हजार 561 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery rate) 97.09 टक्के एवढे झाले आहे.

आजपर्यंत राज्यात तपासण्यात आलेल्या 5 कोटी 68 लाख 74 हजार 491 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 65 लाख 18 हजार 502 (11.46 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
सध्या राज्यात 2 लाख 83 हजार 445 व्यक्ती गृह विलगिकरणात आहेत.
तर 1 हजार 812 व्यक्ती संस्थात्मक विलगिकरणात आहेत.
राज्यात सध्या 47 हजार 919 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण (Active patient) आहेत.

Web Titel :- Maharashtra State Coronavirus Update

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

USB Cable Private Part | ‘वाढीव’ काम करताना 15 वर्षाच्या मुलाच्या गुप्तांगात अडकली USB केबल, करावे लागले ‘ऑपरेशन’

Digital Garage King | पोलीस भरतीची तयारी करणारा तरुण बनला ‘डिजिटल किंग’

Tata Safari Gold | ‘टाटा सफारी’ची गोल्ड एडिशन झाली लाँच, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत