Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात 3,723 जण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  राज्यातील कोरोना संसर्गाची (Coronavirus in Maharashtra) दुसरी लाट अद्याप पूर्णपणे ओसरलेली नाही. शिवाय, तिसऱ्या लाटेची शक्यता देखील वर्तवली जात आहे. राज्यात अजुनही दररोज नवीन कोरोनाबाधित (Coronavirus in Maharashtra) आढळून येत असून, कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यू संख्येतही भर पडतच आहे. तर दररोज आढळणारी कोरोनाबाधितांची संख्या ही कोरोनातून बरे (Recover Patient) होत असलेल्यांच्या तुलनेत कधी कमी तर कधी जास्त आढळून येत आहे. राज्यात आज दिवसभरात 3 हजार 723 रुग्ण बरे झाले आहेत. तर 3 हजार 276 नवीन कोरोनाबाधित आढळले आहे.

राज्यात गेल्या 24 तासात 58 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
राज्यात आजपर्यंत 1 लाख 38 हजार 834 कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
सध्या राज्यातील मृत्यूदर (Case Fatality Rate) 2.12 टक्के एवढा आहे. राज्यात आजपर्यंत 63 लाख 60 हजार
735 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 97.24 टक्के एवढे झाले आहे.

सध्या राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 65 लाख 41 हजार 119 इतकी आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5 कोटी 79 लाख 92 हजार 010 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी
65 लाख 41 हजार 119 (11.28 टक्के) नमुने पॉझिटिव्ह (positive patients) आले आहेत .
सध्या राज्यात 2 लाख 59 हजार 120 व्यक्ती गृह विलगिकरणात (home quarantine) आहेत.
तर, 1 हजार 483 व्यक्ती संस्थात्मक विलगिकरणात (institutional quarantine) आहेत. राज्यात आज रोजी एकूण 37 हजार 984 अ‍ॅक्टिव्ह रूग्ण (Active Cases) आहेत.

 

Web Title : Maharashtra State Coronavirus Update

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Dhol Tasha Pathak | पुण्याच्या ‘त्या’ ढोल-ताशा पथकातील 15 मुलींसह 60 जणांना हैद्राबादमध्ये डांबलं होतं, ‘मनसे’च्या रूपाली ठोंबरे-पाटील अन् सामाजिक कार्यकर्ते अजितसिंह परदेशींनी लढवली ‘शक्कल’, सर्वांची सुखरूप सुटका

Raosaheb Danve | मंत्री रावसाहेब दानवेंनी पुण्यात भरसभेत दाखवला आपल्या अंगावरचा फाटका शर्ट; म्हणाले…

EPFO | मोठा दिलासा ! Aadhaar सोबत PF खाते जोडण्याचा कालावधी वाढवला, जाणून घ्या कधीपर्यंत करू शकता लिंक?