Coronavirus in Maharashtra | दिलासादायक ! राज्यात गेल्या 24 तासात 2,840 ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  राज्यात कोरोना (Coronavirus in Maharashtra) बाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत आज घट झाल्याचे दिसत आहे. बरे होणाऱ्या रुग्णांची (Recover Patient) संख्या देखील आज वाढली आहे. याबरोबरच दैनंदिन मृत्यूची संख्या देखील घडली आहे. मगील काही दिवसांपासून राज्यातील दैनंदिन कोरोना (Coronavirus in Maharashtra) रुग्णांची संख्या अडीच हजाराच्या आसपास स्थिरावली आहे. आजही राज्यात 2 हजार 401 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तसेच 2 हजार 840 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

राज्यात आतापर्यंत 63 लाख 88 लाख 899 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery rate)
97.32 टक्के आहे.
तसेच आज दिवसभरात 39 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आजपर्यंत राज्यात 1 लाख 39 हजार 272 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
त्यामुळे राज्यातील मृत्यूदर (Case Fatality Rate) 2.12 टक्के इतका झाला आहे.

सध्या राज्यात 33 हजार 159 रुग्णांवर उपचार सुरु (Active patient) आहेत.
राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5 कोटी 94 लाख 69 हजार 053 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 65 लाख 64 हजार 915 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
राज्यात सध्या 2 लाख 40 हजार 052 लोक होम क्वारंटाईन आहेत तर 1,388 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

 

Web Title : Maharashtra State Coronavirus Update

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update