Coronavirus : दिलासादायक ! राज्यात गेल्या 24 तासात 59 हजार रुग्ण ‘कोरोना’मुक्त

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मागील काही महिन्यापासून राज्यात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्यातील कडक निर्बंध 1 जून पर्यंत वाढवण्यात आले आहेत. सरकारच्या कोरोना प्रतिबंधात्मक प्रयत्नांनाही काही प्रमाणात यश येताना पाहायला मिळत आहे. राज्यात रुग्ण संख्या कमी झाली, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले, मात्र मृत्यूची संख्या वाढत असल्याने चिंता कायम आहे. राज्यात गेल्या 24 तासात 34 हजार 389 नवीन रुग्ण सापडले आहेत. तर 974 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

गेल्या 24 तासात राज्यात 59 हजार 318 रुग्ण बरे झाले आहेत. आजपर्यंत 48 लाख 26 हजार 371 रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. सध्या राज्यामध्ये कोरोना बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 89.74 टक्के आहे. रुग्ण बरे होत असताना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. आज राज्यात 974 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत राज्यात 81 हजार 486 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात रुग्ण मृत्यू होण्याचे प्रमाण 1.52 टक्के आहे.

सध्या राज्यामध्ये 4 लाख 68 हजार 109 रुग्ण अ‍ॅक्टिव्ह आहेत. राज्यात सर्वाधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण पुण्यात आहेत पुण्यात 82 हजार 397 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3 कोटी 11 लाख 03 हजार 991 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 53 लाख 78 हजार 452 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण 17.29 टक्के आहे. सध्या राज्यात 34 लाख 91 हजार 981 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत. तर 28 हजार 398 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.