Coronavirus : राज्यात ‘कोरोना’चे 3451 नवीन रुग्ण, 30 जणांचा मृत्यू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  राज्यात कोरोना रुग्णवाढीचे सत्र गेल्या काही दिवसांपासून घटत असताना आज रुग्णांची संख्या वाढली आहे. तसेच मृतांच्या संख्येत वाढ होत असल्याने आरोग्य प्रशासनाच्या चिंतेत वाढ झाली आहे. राज्यात आज 30 जणांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. तर दिवसभरात 3 हजार 451 नवीन रुग्णांची भर पडली आहे, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

राज्यात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव आटोक्यात येत आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या आकडेवारीत चढ उतार होताना दिसत आहे. गेले काही दिवस कोरोना रुग्ण बरे होण्याचा आकडा वाढत होता. तर गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधितांचा आकडा पुन्हा वाढला आहे. आज राज्यात 30 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. राज्यात आजपर्यंत 51 हजार 390 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, सध्या राज्यातील मृत्यूदर 2.50 टक्के इतका झाला आहे.

गेल्या 24 तासांत 3 हजार 451 रुग्णांची भर पडली असून आजपर्यंत कोरोना बाधितांच्या रुग्णांची एकूण संख्या 20 लाख 52 हजार 253 इतकी झाली आहे. तर आज दिवसभरात 2 हजार 421 रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत 19 लाख 63 हजार 946 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.7 टक्के इतके झाले आहे. राज्यात सध्या 35 हजार 633 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.