Coronavirus : राज्यात ‘कोरोना’चे 3365 नवीन रुग्ण, 23 जणांचा मृत्यू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात पुन्हा कोरोनाने उचल खाल्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून चिंतेचे वातावरण असून रुग्णवाढीचा विचार करता कालच्या तुलनते आज काहिंसा दिलासा मिळाला आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारी नुसार, आज (सोमवार) राज्यात 3 हजार 365 कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून 23 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली आहे.

राज्यात रविवारी (दि.14) 4 हजार 092 नव्या रुग्णांची भर पडली होती. त्यानंतर आजचा रुग्णांचा आकडा काहिंसा कमी झाला आहे. आज राज्यात 23 रुग्णांचा मृत्यू झाला आहे तर काल हा आकडा 40 इतका होता. राज्यातील सध्याचा मृत्यू दर 2.49 टक्के इतका आहे. तर आज दिवसभरात 3 हजार 105 रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. राज्यात आजपर्य़ंत 19 लाख 78 हजार 708 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.7 टक्के इतके झाले आहे.

सध्या राज्यात 36 हजार 201 ॲक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 1 कोटी 53 लाख 59 हजार 026 प्रयोगशाळा नमुन्यापैकी 20 लाख 67 हजार 643 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण 13.46 टक्के इतके आहे. सध्या 1 लाख 74 हजार 704 व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत, तर 1 हजार 714 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.