Coronavirus : राज्यातील ‘कोरोना’ रुग्णांची धक्कादायक आकडेवारी, गेल्या 24 तासात 9 हजाराहून अधिक नवीन रुग्ण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  मार्चच्या सुरुवातीच्या आठवड्यातच राज्यातील कोरोनानं पुन्हा रौद्र रुप धारण केलं आहे. गेल्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात या वर्षातील सर्वाधिक 8 हजार नव्या रुग्णांची नोंद झाली होती. आता मार्चच्या पहिल्याच आठवड्यात विक्रमी कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. कोरोनाच्या नव्या रुग्णांचा आकडा 9 हजारांच्या वर गेला आहे. मुंबई-पुण्याचा धोका सर्वाधिक वाढला आहे.

राज्याच्या आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासात राज्यात तब्बल 9 हजार 855 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. गेले काही दिवस हा आकडा 8 हजारांवर होता. मात्र, आजचा आकडा राज्याची चिंता वाढवणारा आहे. सर्वात जास्त कोरोना रुग्णांची नोंद आज झाली आहे. पुणे आणि मुंबईत आज सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. पुण्यात दिवसभरात 853 तर मुंबईत 1121 नवे रुग्ण आढळून आले आहेत.

 

राज्यातील आजची कोरोना रुग्णांची आकडेवारी

एकूण रुग्ण – 21,79,185

उपचार घेत असलेले रुग्ण – 82,343

दिवसभरातील नवे रुग्ण – 9,855

दिवसभरात बरे झालेले रुग्ण – 6,559

एकूण बरे झालेले रुग्ण – 20,43,349

दिवसभरातील मृत्यू – 42

मृत्यूचे प्रमाण – 2.40 %

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण – 93.77 %