Coronavirus : राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’ चे 8998 नवे रुग्ण, 6135 जणांना डिस्चार्ज

मुंबई : पोलीसानामा ऑनलाइन – राज्यात कोरोना संसर्गाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. दररोज मोठ्या संख्येने कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. याशिवाय राज्यात मृत्यूची संख्या देखील वाढत आहे. यामुळे सर्वसामान्यांसह सरकारची चिंता वाढत आहे. आज (गुरुवार) दिवसभरात 8 हजार 998 नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत तर 60 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर 2.39 टक्के आहे.

आज राज्यात 60 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 52 हजार 340 जणांचा मृत्यू झाला आहे. तर आज दिवसभरात 6 हजार 135 रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. राज्यात आजपर्यंत 20 लाख 49 हजार 484 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 93.66 टक्के इतके झाले आहे.

सध्या राज्यात 85 हजार 144 ॲक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 1 कोटी 65 लाख 96 हजार 300 प्रयोगशाळा नमुन्यापैकी 21 लाख 88 हजार 183 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण 13.18 टक्के इतके आहे. सध्या राज्यात 3 लाख 91 हजार 288 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर 4 हजार 109 व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात आहेत.