Coronavirus : राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’ चे 15051 नवीन रुग्ण, 10,671 रुग्णांना डिस्चार्ज

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्ये दिवसेंदिवस मोठी वाढ होत आहे. राज्यात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढ होत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. राज्या मागील काही दिवसांपासून कोरोना बाधित रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. राज्यात गेल्या 24 तासात 15 हजार 051 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 23 लाख 29 हजार 464 इतकी झाली असून रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण 13.23 टक्के इतके झाले आहे.

राज्यात रुग्ण वाढत असताना राज्यातील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. सध्या राज्यात 1 लाख 30 हजार 547 ॲक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. रुग्ण वाढत असताना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण काही प्रमाणात वाढत असल्याने प्रशासनाला दिलासा मिळात आहे. गेल्या 24 तासात राज्यात 10 हजार 671 रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 21 लाख 44 हजार 743 रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण घटले आहे. सध्या रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 92.07 टक्के इतके आहे.

राज्यात गेल्या 24 तासात 48 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या रुग्णांची संख्या 52 हजार 909 एवढी झाली आहे. राज्यात मृत्यू होण्याचे प्रमाण 2.27 टक्के इतके आहे. आजपर्यंत घेण्यात आलेल्या 1 कोटी 76 लाख 09 हजार 248 प्रयोगशाळा तपासण्यामध्ये 23 लाख 29 हजार 464 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सध्या 6 लाख 23 हजार 121 रुग्ण होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर 6 हजार 114 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.