Coronavirus : राज्यात ‘कोरोना’ धोका कायम ! गेल्या 24 तासात 55 हजार 469 नवीन रुग्ण, 297 जणांचा मृत्यू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढते आहे. प्रशासनाने कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी कंबर कसली आहे. असे असले तरी देखील रुग्णवाढ झपाट्याने वाढताना दिसत आहे. राज्यात गेल्या 24 कोरोनाचे 55 हजार 469 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने मिनी लॉकडाऊन करण्यात आला आहे. तसेच लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणात राबवण्यात येत आहे. मात्र, कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होताना दिसत नसल्याने प्रशासनाची चिंता अधिक वाढली आहे.

आज राज्यात 34 हजार 256 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 25 लाख 83 हजार 331 रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण घटत चालले आहे. सध्या राज्यामध्ये कोरोना बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 82.98 टक्के आहे. रुग्ण वाढत असताना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. आज राज्यात 297 रुग्णांचा मृत्यू झाला असून आजपर्यंत 56 हजार 330 जणांना जीव गमवावा लागला आहे. राज्यात रुग्ण मृत्यू होण्याचे प्रमाण 1.81 टक्के आहे.

सध्या राज्यामध्ये 4 लाख 72 हजार 283 रुग्ण अ‍ॅक्टिव्ह आहेत. राज्यात सर्वाधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण पुण्यात आहेत पुण्यात 84 हजार 309 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 2 कोटी 09 लाख 17 हजार 486 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 31 लाख 13 हजार 354 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण 14.88 टक्के आहे. सध्या राज्यात 24 लाख 55 हजार 498 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत. तर 22 हजार 797 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यातील प्रमुख शहरातील अ‍ॅक्टिव्ह रुग्ण

देशामध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात पुण्यात सर्वाधिक 84309, मुंबई 79368, ठाणे 61127, नाशिक 31688, औरंगाबाद 17818, नांदेड 11418, नागपूर 57372, जळगाव 7770, अहमदनगर 17405 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.