Coronavirus in Maharashtra : राज्यात ‘कोरोना’चा विस्फोट ! राज्यात गेल्या 24 तासात 63 हजारांहून अधिक रुग्ण, 398 जणांचा मृत्यू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  राज्यात दिवसेंदिवस कोरोना संसर्गाचा उद्रेक पहायला मिळत आहे. दररोज मोठ्या संख्येने रुग्ण आढळून येत असून, मत्यूंच्या संख्येतही मोठी वाढ होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कडक निर्बंध लागू करत, राज्यात 15 दिवसांची संचारबंदी देखील घोषित केली आहे. मागील काही दिवसांपासून 55 ते 60 हजारांच्या दरम्यान रुग्ण आढळून येत होते. राज्यात कोरोनाचा प्रकोप थांबायचे नाव घेत नाही. आज (शुक्रवार) राज्यात सर्वाधिक 63 हजार 729 रुग्णांचे निदान झाले आहे. गेल्या काही महिन्यातील हा सर्वाधिक आकडा आहे.

देशातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने राज्यात लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. आज राज्यात 45 हजार 335 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 30 लाख 04 हजार 391 रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण घटत चालले आहे. सध्या राज्यामध्ये कोरोना बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 81.12 टक्के आहे. रुग्ण वाढत असताना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. आज राज्यात 398 रुग्णांचा मृत्यू झाला असून आजपर्यंत 59 हजार 551 जणांना जीव गमवावा लागला आहे. राज्यात रुग्ण मृत्यू होण्याचे प्रमाण 1.61 टक्के आहे.

सध्या राज्यामध्ये 6 लाख 38 हजार 034 रुग्ण अ‍ॅक्टिव्ह आहेत. राज्यात सर्वाधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण पुण्यात आहेत पुण्यात 1 लाख 16 हजार 665 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 2 कोटी 33 लाख 08 हजार 878 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 37 लाख 03 हजार 584 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण 15.89 टक्के आहे. सध्या राज्यात 35 लाख 14 हजार 181 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत. तर 25 हजार 168 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.