Coronavirus : राज्यात ‘कोरोना’ची धडकी भरवणार आकडेवारी ! गेल्या 24 तासात 67 हजार 468 नवीन रुग्ण, 568 जणांचा मृत्यू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   राज्यात कोरोना संसर्गाचा उद्रेक झाला आहे. दररोज मोठ्या संख्येने कोरोनाबाधित आढळून येत आहेत. रुग्णांच्या मृत्यूंच्या संख्येतही मोठी वाढ झाली आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकार वेगवेगळ्या उपाययोजना करत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी राज्यात लसीकरण मोहीम देखील सुरु आहे. तरी देखील कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळून येत आहेत. राज्यातील आजची आकडेवारी धडकी भरवणारी आहे. राज्यात आज रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. शिवाय मृतांची संख्या देखील वाढली आहे. तर अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 7 लाखांच्या उंबरठ्यावर पोहचली आहे.

आज दिवसभरात राज्यात 67 हजार 468 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर 568 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज राज्यात 54 हजार 985 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 32 लाख 68 हजार 449 रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण घटत चालले आहे. सध्या राज्यामध्ये कोरोना बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 81.15 टक्के आहे. रुग्ण वाढत असताना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. आज राज्यात 568 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आजपर्यंत 54 हजार 985 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात रुग्ण मृत्यू होण्याचे प्रमाण 1.54 टक्के आहे.

सध्या राज्यामध्ये 6 लाख 95 हजार 747 रुग्ण अ‍ॅक्टिव्ह आहेत. राज्यात सर्वाधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण पुण्यात आहेत पुण्यात 1 लाख 21 हजार 284 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 2 कोटी 46 लाख 14 हजार 480 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 40 लाख 27 हजार 827 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण 16.36 टक्के आहे. सध्या राज्यात 39 लाख 15 हजार 292 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत. तर 28 हजार 384 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यातील प्रमुख शहरातील अ‍ॅक्टिव्ह रुग्ण

देशामध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात पुण्यात सर्वाधिक 1,21,284, मुंबई 83450, ठाणे 78473, नाशिक 46253, औरंगाबाद 15206, नांदेड 13908, नागपूर 80155, जळगाव 14190, अहमदनगर 19046 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.