Coronavirus : राज्यात ‘कोरोना’चा कहर सुरुच ! गेल्या 24 तासात 568 रुग्णांचा मृत्यू, 67 हजाराहून अधिक नवीन रुग्ण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन- राज्यात आज (गुरुवार) रात्री आठ वाजल्यापासुन लॉकडाऊन करण्यात आले आहे. यापूर्वी देखील राज्यात कठोर निर्बंध लागू असतानाही कोरोनाचे रुग्ण आणि मृत्यू नियंत्रणात येत नसल्याचे दिसून आले. या पार्श्वभूमीवर कठोर लॉकडाऊन लागू करण्यात आल्याचे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले असताना दुसरीकडे राज्यात कोरोनाचं भीषण रुप दिवसेंदिवस अधिकच भीषण होत आहे. गेल्या 24 तासांमध्ये राज्यात तब्बल 568 मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यामळे राज्यातला मृत्यूदर 1.53 टक्के इतका झाल्याचे आरोग्य विभागाकडून जाहीर करण्यात आले आहे.

गेल्या 24 तासात राज्यात 67 हजार 013 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 62 हजार 298 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 33 लाख 30 हजार 747 रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण घटत चालले आहे. सध्या राज्यामध्ये कोरोना बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 81.34 टक्के आहे. रुग्ण वाढत असताना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत आहे.

सध्या राज्यामध्ये 6 लाख 99 हजार 858 रुग्ण अ‍ॅक्टिव्ह आहेत. राज्यात सर्वाधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण पुण्यात आहेत पुण्यात 1 लाख 17 हजार 337 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 2 कोटी 48 लाख 95 हजार 986 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 40 लाख 94 हजार 840 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण 16.45 टक्के आहे. सध्या राज्यात 39 लाख 71 हजार 917 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत. तर 29 हजार 014 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यातील प्रमुख शहरातील अ‍ॅक्टिव्ह रुग्ण

देशामध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात पुण्यात सर्वाधिक 1,17,337, मुंबई 82616, ठाणे 80743, नाशिक 46706, अहमदनगर 22023, सातारा 14316, सोलापूर 13587, रायगड 13928,जळगाव 14121, औरंगाबाद 13520, लातूर 16732 नांदेड 12585, नागपूर 80924 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.