Coronavirus in Maharashtra : गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 56 हजार 647 नवीन रुग्ण, 669 जणांचा मृत्यू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत महाराष्ट्राला मोठा फटका बसला आहे. महाष्ट्रात मागील काही दिवसांपासून 60 हजारांच्या वर रुग्ण आढळून येत होते. मात्र, आज रुग्णसंख्येत घट झाली आहे. यामुळे राज्याला एक दिलासा मिळाला आहे. कोरोना बाधितांच्या वाढीला ब्रेक लागला असला तरी रुग्णांच्या मृत्यूमुळे ही चिंता वाढत आहे. आज दिवसभरात राज्यात 56 हजार 647 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर 669 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आज राज्यात 51 हजार 356 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 39 लाख 81 हजार 658 रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. सध्या राज्यामध्ये कोरोना बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 84.31 टक्के आहे. रुग्ण वाढत असताना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. आज राज्यात 669 रुग्णांचा मृत्यू झाला असून आजपर्यंत 70 हजार 284 जणांना जीव गमवावा लागला आहे. राज्यात रुग्ण मृत्यू होण्याचे प्रमाण 1.49 टक्के आहे.

सध्या राज्यामध्ये 6 लाख 68 हजार 353 रुग्ण अ‍ॅक्टिव्ह आहेत. राज्यात सर्वाधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण पुण्यात आहेत पुण्यात 1 लाख 09 हजार 254 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 2 कोटी 76 लाख 52 हजार 758 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 47 लाख 22 हजार 401 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण 17.8 टक्के आहे. सध्या राज्यात 39 लाख 96 हजार 946 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत. तर 27 हजार 735 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.