Coronavirus : चिंता कायम ! राज्यात ‘कोरोना’चे 62 हजार 194 नवीन रुग्ण; 853 रुग्णांचा मृत्यू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  राज्यातील कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस अधिक बिकट बनत चालली आहे. कोरोना रुग्णांची संख्या आणि मृत्यूचं प्रमाणही सातत्याने वाढत आहे. आज दिवसभरात तब्बल 62 हजार 194 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तर 853 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील स्थिती अधिकाधिक चिंताजनक बनत असल्याच चित्र आजच्या आकडेवारीवरुन दिसून येत आहे.

आज राज्यात 63 हजार 842 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 42 लाख 27 हजार 940 रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण घटत चालले आहे. सध्या राज्यामध्ये कोरोना बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 85.54 टक्के आहे. रुग्ण वाढत असताना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. आज राज्यात 853 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत राज्यात 73 हजार 515 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात रुग्ण मृत्यू होण्याचे प्रमाण 1.49 टक्के आहे.

सध्या राज्यामध्ये 6 लाख 39 हजार 075 रुग्ण अ‍ॅक्टिव्ह आहेत. राज्यात सर्वाधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण पुण्यात आहेत पुण्यात 1 लाख 15 हजार 182 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 2 कोटी 86 लाख 61 हजार 668 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 49 लाख 42 हजार 736 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण 17.16 टक्के आहे. सध्या राज्यात 38 लाख 26 हजार 089 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत. तर 29 हजार 406 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.