Coronavirus : मोठा दिलासा ! राज्यात ‘कोरोना’चे 39 हजार नवीन रुग्ण, 53 हजार रुग्णांना डिस्चार्ज, रिकव्हरी रेट 88.68 %

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  मागील दोन महिन्यांमध्ये महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढ झाल्याचे पहायला मिळत आहे. सातत्याने वाढणाऱ्या बाधितांच्या संख्येसोबतच राज्यात मृतांचा आकडा देखील वाढताच राहिला. मात्र, गेल्या काही दिवसांमध्ये राज्याच्या आरोग्य विभागाकडून देण्यात येत असलेल्या आकडेवारीमध्ये काहीसं दिलासादायक चित्र पहायला मिळू लागले आहे. गुरुवारच्या आकडेवारीनुसार राज्यात 42 हजार 582 नवीन रुग्ण होते तर 54 हजार 535 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज (शुक्रवार) नव्या रुग्णांच्या संख्येत अजून घट झाल्याचे दिसून येत आहे. आज राज्यात 39 हजार 923 नवे कोरोनाबाधित आढळले असून 53 हजार 249 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. मागील काही दिवसांपासून रुग्ण बरे होत असल्याचे प्रमाण वाढल्याने राज्याचा रिकव्हरी रेट 88.68 टक्क्यांवर गेला आहे.

आजपर्यंत 47 लाख 07 हजार 980 रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. सध्या राज्यामध्ये कोरोना बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 88.68 टक्के आहे. रुग्ण बरे होत असताना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. आज राज्यात 695 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत राज्यात 79 हजार 552 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात रुग्ण मृत्यू होण्याचे प्रमाण 1.5 टक्के आहे.

सध्या राज्यामध्ये 5 लाख 19 हजार 254 रुग्ण अ‍ॅक्टिव्ह आहेत. राज्यात सर्वाधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण पुण्यात आहेत पुण्यात 96 हजार 028 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3 कोटी 06 लाख 02 हजार 140 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 53 लाख 09 हजार 215 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण 17.35 टक्के आहे. सध्या राज्यात 34 लाख 82 हजार 425 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत. तर 28 हजार 312 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.