Coronavirus : दिलासादायक ! राज्यात गेल्या 24 तासात 44,493 रुग्ण ‘कोरोना’मुक्त

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव गेल्या काही दिवसांपासून कमी होताना दिसून येत आहे. राज्यातील कोरोना रुग्णांची संख्याही आता 30 हजारांच्या आत आली आहे. राज्यात गेल्या 24 तासात 29 हजार 644 रुग्ण सापडले आहेत. राज्यात आज 555 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून, सध्या राज्यातील मृत्यूदर 1.57 टक्के एवढा आहे. राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असताना सरकारने कोरोना साखळी तोडण्यासाठी कलेल्या लॉकडाऊनला काही प्रमाणात यश येताना दिसत आहे.

गेल्या 24 तसात 44 हजार 493 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण 50 लाख 70 हजार 801 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 91.74 टक्के एवढा झाला आहे. गेल्या 24 तासात राज्यात 29 हजार 644 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यातील कोरोना बाधित रुग्मांची संख्या 55 लाख 27 हजार 092 इतकी झाली असून रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण 17.04 टक्के इतके आहे.

आज राज्यात 555 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत राज्यात 86 हजार 618 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात रुग्ण मृत्यू होण्याचे प्रमाण 1.57 टक्के आहे. सध्या राज्यामध्ये 3 लाख 67 हजार 121 रुग्ण अ‍ॅक्टिव्ह आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3 कोटी 24 लाख 41 हजार 776 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 55 लाख 27 हजार 092 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 27 लाख 94 हजार 457 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत. तर 20 हजार 946 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.