Coronavirus : दिलासादायक ! राज्यात गेल्या 24 तासात 29,177 रुग्ण ‘कोरोना’मुक्त

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोना संसर्गाची दुसरी लाट ओसरताना दिसत आहे. राज्यातील दैनंदिन कोरोना रुग्णांची संख्या आजही 30 हजारांच्या खाली राहिली. गेल्या 24 तासात राज्यात 26 हजार 672 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने कमी होत आहे. नवीन रुग्णांच्या तुनलेत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी असल्याने रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. राज्यात एकवेळ सक्रिय रुग्णांची संख्या 7 लाखांच्या जवळ पोहचली होती. मात्र, आता हा आकडा झपाट्याने खाली आला आहे.

गेल्या 24 तसात 29 हजार 177 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण 51 लाख 40 हजार 272 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 92.12 टक्के एवढा झाला आहे. राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 55 लाख 79 हजार 897 इतकी झाली असून रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण 16.9 टक्के इतके आहे.

आज राज्यात 594 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात रुग्ण मृत्यू होण्याचे प्रमाण 1.59 टक्के आहे. सध्या राज्यामध्ये 3 लाख 48 हजार 395 रुग्ण ॲक्टिव्ह आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3 कोटी 30 लाख 13 हजार 516 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 55 लाख 79 हजार 897 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 26 लाख 96 हजार 306 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत. तर 21 हजार 771 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.