Coronavirus : दिलासादायक ! राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 9,350 नवीन रुग्ण, तर 15,176 जणांना डिस्चार्ज

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात आज (मंगळवार) 09 हजार 350 नवीन कोरोनाबाधित (Coronavirus) रुग्णांची नोंद झाली आहे. तर 15 हजार 176 कोरोनाबाधित रुग्णांना डिस्चार्ज (Discharge) देण्यात आला आहे. त्यामुळे कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 56 लाख 69 हजार 179 इतकी झाली आहे. तर राज्याचा रिकव्हरी रेट (Recovery rate) 95.69 टक्के झाला आहे. आज 388 कोरोना बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आजपर्यंत 1 लाख 14 हजार 154 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण 1.93 टक्के आहे.

राज्यात सध्यात 1 लाख 38 हजार 361 सक्रीय रुग्ण (Active patient) आहेत. राज्यात आजपर्यंत 3 कोटी 84 लाख 18 हजार 130 प्रयोगशाळा चाचण्या (Laboratory tests) करण्यात आल्या आहेत. त्यापैकी 59 लाख 24 हजार 773 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. राज्यात सध्या 09 लाख 04 हजार 462 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर 5 हजार 621 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

पुणे शहरातील (Pune City) कोरोनाची आकडेवारी
दिवसभरात 246 पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.
दिवसभरात 351 रुग्णांना डिस्चार्ज.
पुण्यात करोनाबाधीत 21 रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील 11.
483 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 474545.
पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 2773.
एकूण मृत्यू -8492.
आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज 463280.
आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 4748.

पिंपरी-चिंचवड (PCMC) शहरातील कोरोनाची आकडेवारी

दिवसभरात 199 पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.
दिवसभरात 224 रुग्णांना डिस्चार्ज.
शहरात 07 रुग्णांच्या मृत्यूची नोंद. तर 24 तासात 2 जणांचा मृत्यू
शहरात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 254289.
शहरातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 1520.
एकूण मृत्यू – 4230.
आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज – 248539.
आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 3235.

 

पुणे जिल्ह्यातील रिकव्हरी रेट 97.20 रुग्ण

पुणे जिल्ह्यातील (Pune district) कोरोना बाधीत एकूण 10 लाख 32 हजार 917 रुग्णांपैकी 10 लाख 3 हजार 992 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टिव्ह रुग्ण (Active patient) 11 हजार 563 आहे. कोरोनाबाधित एकूण 17 हजार 362 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 1.68 टक्के इतके आहे तर बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण (Recovery rate) 97.20 टक्के आहे.

Wab Title :- Maharashtra State Coronavirus Update | policenama

Ramdas Athawale | ‘मुख्यमंत्रीपदाची फक्त इच्छा व्यक्त करून चालणार नाही’, आठवलेंचा नाना पटोलेंना सल्ला

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा