Coronavirus : मोठा दिलासा ! राज्यात ‘कोरोना’चे 48,401 नवीन रुग्ण; 60 हजारांवर रुग्ण कोरोनामुक्त

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोना संसर्गाचा उद्रेक मोठ्या प्रमाणात झाला आहे. दररोज मोठ्या संख्येने कोरोनाबाधित आढळून येत आहेत. रुग्णांच्या मृत्यूंच्या संख्येतही मोठी वाढ झाली आहे. मात्र आता नवीन रुग्णांच्या संख्येत घट होताना पहायला मिळत आहे. आज राज्यात कोरोना रुग्णांच्या तुलनेत कोरोनामुक्त रुग्णांची संख्या अधिक आहे. तर राज्यातील कोरोना मृत्यूचा आकडाही आटोक्यात येताना दिसत असल्याने दिलासा मिळाला आहे. आज दिवसभरात राज्यात 48 हजार 401 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर 572 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आज राज्यात 60 हजार 226 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 44 लाख 07 हजार 818 रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे. सध्या राज्यामध्ये कोरोना बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 86.4 टक्के आहे. रुग्ण वाढत असताना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण कमी होत आहे. आज राज्यात 570 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत राज्यात 75 हजार 849 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात रुग्ण मृत्यू होण्याचे प्रमाण 1.49 टक्के आहे.

सध्या राज्यामध्ये 6 लाख 15 हजार 783 रुग्ण अ‍ॅक्टिव्ह आहेत. राज्यात सर्वाधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण पुण्यात आहेत पुण्यात 1 लाख 316 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 2 कोटी 94 लाख 38 हजार 797 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 51 लाख 01 हजार 737 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण 17.33 टक्के आहे. सध्या राज्यात 36 लाख 96 हजार 896 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत. तर 26 हजार 939 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.