Maharashtra State Employees | ठाकरे सरकारच्या कंत्राट नोकरभरतीला कर्मचारी संघटनांचा तीव्र विरोध

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra State Employees | महाविकास आघाडी सरकारने (Mahavikas Aghadi Government) राज्याच्या तिजोरीवरील भार कमी करण्यासाठी कंत्राटी पद्धतीने नोकर भरती (Maharashtra State Employee) करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे 30 टक्के खर्चाची बचत होणार आहे. मात्र सरकारच्या या निर्णयाला कर्मचारी संघटनांनी (Employees Organizations) तीव्र विरोध केला आहे. (Maharashtra State Employees)

राज्याच्या वित्त विभागाने (Department of Finance) विकासकामांना पुरेसा निधी मिळावा म्हणून शासकीय खर्च आटोक्यात आणण्यासाठी नवीन पद निर्मिती न करता बाह्ययंत्रणेद्वारे भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारमधील काही कामे ही बाह्ययंत्रणेद्वारे केली जातील. यामुळे सरकारच्या खर्चात 30 टक्क्यांची बचत होणार आहे. मात्र काही पदे अशी आहेत की ती बाह्ययंत्रणेद्वारे भरता येऊ शकत नाही, ती पदे नियमित भरणे आवश्यक आहे. त्यामध्ये मंत्रालयीन विभागातील लिपिक (Clerk), टंकलेखक (Typist), स्वीय सहायक (Self Helper), लघुटंकलेखक (Shorthand Writer), सर्व कार्यालयांमधील कनिष्ठ लेखापाल (Junior Accountant) आदी पदांचा समावेश असून ही पदे बाह्ययंत्रणेतून वगळण्याचा निर्णयही वित्त विभागाने घेतला आहे. (Maharashtra State Employees)

तर राज्य मंत्रिमंडळाने (Maharashtra State Cabinet) काही दिवसांपूर्वी सरळ सेवा पद्धतीने वैद्यकीय शिक्षण, सार्वजनिक आरोग्य आणि गृह विभागातील तृतीय व चतुर्थ श्रेणीतील 100 टक्के पदे भरण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख (Amit Deshmukh) यांनी शासकीय रुग्णालये आणि वैद्यकीय महाविद्यालयांतील ही पदे बाह्ययंत्रणेद्वारे भरण्याची भूमिका घेत असल्याची टीका कर्मचारी संघटनांनी केली आहे.

या पदांची होणार कंत्राटी भरती –
संगणक अभियंता, डेटा एंट्री ऑपरेटर, वाहनचालक, माळी व इतर अर्धकुशल कामगार टेलिफोन ऑपरेटर, त्याशिवाय लिफ्ट ऑपरेटर, केअरटेकर, शिपाई, चपराशी, चौकीदार, सफाई कर्मचारी, मदतनीस, हमाल व इतर पदे यांची बाह्ययंत्रणेद्वारे भरती होणार आहे.

राज्य सरकारी चतुर्थश्रेणी कर्मचारी मध्यवर्ती महासंघाचे भाऊसाहेब पठाण (Bhausaheb Pathan) म्हणाले की, ”सरकारने जो कंत्राटी नोकरभरतीचा निर्णय घेतला आहे तो अत्यंत चुकीचा आहे. आमची संघटना या निर्णयाविरुद्ध मोठे आंदोलन उभारले.”

राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे सरचिटणीस विश्वास काटकर (Vishwas Katkar) म्हणाले की,
”सरकारने कायमस्वरूपी पदे भरण्याची घोषणा केली होती. मात्र स्वतः या घोषणेला हरताळ फासला आहे.
कंत्राटी भरतीचा निर्णय मागे घ्यावा अशी आमची मागणी आहे.
त्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना यामध्ये लक्ष घालून निर्णय घ्यावा
असे विनंती पत्र त्यांना पाठवण्यात आल्याचे,” काटकर यांनी सांगितले.

Web Title : Maharashtra State Employees | maharashtra contract mega recruitment of state employees employees union angry over governments decision

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

शारीरीक संबंधाचे व्हिडिओ व्हायरल करण्याची दिली धमकी;
घरी, वेगवेगळ्या हॉटेल रुममध्ये आणि कारमध्ये बोलावून लैंगिक अत्याचार

 

Navneet Ravi Rana Sent To Judicial Custody | राणा दाम्पत्याच्या अडचणीत मोठी वाढ !
कोर्टाने सुनावली 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, जामीन अर्जावरील सुनावणीही लांबणीवर

 

 घरात घुसून 18 वर्षाच्या तरुणीचा विनयभंग, हडपसरच्या फुरसुंगी परिसरातील घटना

 

Pune Crime | इन्स्टाग्रामवर बनला मित्र, 20 वर्षाच्या तरुणीला कोल्ड्रींग मधून गुंगीचे औषध देऊन दाखवलं ‘काम’,
बलात्कार प्रकरणी FI