महाराष्ट्रात डिसेंबरपर्यंत कशी असावी परिस्थिती ? वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला मोलाचा सल्ला, म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाचा Corona प्रार्दुभाव रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. सध्या महाराष्ट्र राज्य कोरोना व्हायरस महामारीच्या संकटाला तोंड देत आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकारनं जाहीर केलेला लॉकडाऊन दोन दिवसांनी संपणार आहे. मात्र, त्यानंतर राज्यात लॉकडाऊनची कशी परिस्थिती असेल असा प्रश्न उपस्थित झाला. या पार्श्वभूमीवर, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील लॉकडाऊनमध्ये वाढ करण्यात आली आहे. शुक्रवारी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यासंदर्भात घोषणा केली. आणि राज्य सरकारनं १५ जूनपर्यंत लॉकडाऊनमध्ये वाढ केली आहे.

‘वीज कर्मचाऱ्यांना फ्रन्टलाईन वर्कर दर्जा देऊन 50 लाखांचे विमा संरक्षण द्या’; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी

ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे Corona रुग्ण वाढत आहेत अशा जिल्ह्यांमध्ये शिथिलता दिसणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. ज्या जिल्ह्यांमध्ये रुग्णांची संख्या घटली आहे. तसंच पॉझिटिव्हिटी रेटचा अभ्यास करुन त्या जिल्ह्यांमध्ये काही प्रमाणात निर्बंध उठवले जातील. दरम्यान अत्यावश्यक दुकानांव्यक्तिरिक्त कसे निर्बंध उठवले जातील याचा निर्णय मुख्यमंत्री घेतील, असं राजेश टोपेंनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान राजकीय सभा, सामाजिक कार्यक्रम किंवा धार्मिळ मेळावा या गोष्टीमुळे पसरणाऱ्या कार्यक्रमास दोन महिन्यांपर्यंत परवानगी देऊ नये असं मत वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. तर काहींनी राज्यात डिसेंबरपर्यंत गोष्टी धीम्या गतीनं नेण्याचा सल्ला दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रत्येक जिल्ह्यातल्या परिस्थितीचा आढावा घेतील आणि त्यानंतर नव्या मार्गदर्शक नियमावली जाहीर करतील, असं टोपे यांनी म्हटलं.

पावसाळ्यासंबंधी आवश्यक दुकानं उघडण्यासाठी परवानगी द्यावी
अवघ्या काही दिवसांवर पावसाळा येत असल्यानं बीएमसीनं काही पावसाळ्यासंबंधी आवश्यक दुकानं उघडण्यासाठी परवानगी द्यावी, अशी विनंती राज्य सरकारकडे केली आहे. गृह दुरुस्ती एजन्सी, सुतार, छत्रीची दुकानं आणि पावसाळ्याच्या तयारीशी संबंधित दुकानं सुरु करण्याबाबत राज्य सरकारनं विचार करावा अशी विनंती केल्याचं, मुंबई महापालिका अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितलं.

लोकल ट्रेन बंद
१० दिवसांत शहराचा पॉझिटिव्हिटी रेट ५% पेक्षा कमी झाला आहे. मात्र तरी देखील लोकल ट्रेन अद्याप सुरु करण्याचा विचार नाही आहे, असं काकाणी यांनी म्हटलं. शुक्रवारी हा दर ३ टक्के होता. मुंबईत लोकल ट्रेन सामान्य प्रवाशांसाठी सुरु करण्याची अद्याप कोणतीच योजना आखली नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

वैद्यकीय तज्ज्ञांचं मत
राज्य सरकारचे तांत्रिक सल्लागार डॉ. सुभाष साळुंखे यांनी म्हटलं की, कोरोना व्हायरसच्या रुग्णांचा सतत वाढणारा आकडा लक्षात घेता राज्याला डिसेंबर महिन्यापर्यंत हा वेग कमी करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे राज्यानं डिसेंबरपर्यंत हळूहळू निर्बंध उठवणं आवश्यक आहे. जर घाईघाईनं निर्बंध उठवले तर पुन्हा एकदा राज्यात कोरोनाचा Corona कहर पाहायला मिळेल, असं साळुंखे यांनी म्हटलं आहे. कोरोनामुळे होणाऱ्या मृतांची संख्याही अधिक आहे तसंच लसीकरणही धीम्या गतीनं सुरु आहे. त्यामुळे निर्बंध पूर्णतः उठवणं चुकीचं ठरेल, असं साळुंखे म्हणालेत. दरम्यान राज्यात कोरोनाबाधितांच आकडा कमी होत असल्यानं निर्बंधांमध्ये शिथिलता आणण्याची मागणी केली जात आहे. मात्र वैद्यकीय तज्ज्ञांनी याविरोधात भूमिका घेत सावधगिरी बाळगण्याची गरज असल्याचं राज्य सरकारी अधिकाऱ्यानं सांगितलं आहे.

Also Read This : 

‘या’ ९ पदार्थांनीसुद्धा दूर करा कॅल्शियमची कमतरता, जाणून घ्या

 

पेट्रोल, डिझेलच्या दरात महिन्यातील 15 व्या वेळेस वाढ !

TATA ग्रुपने बिग बास्केटमध्ये खरेदी केली मोठी भागीदारी, Amazon आणि Flipkart ला मिळणार ‘टक्कर’

Aadhaar कार्ड Lock करण्याची सोपी पद्धत, असे करा लॉक; तुमची माहिती राहिल सुरक्षित, जाणून घ्या

 

जुन्या नावाने नवीन औषधे विकण्यास केंद्राची बंदी