Flood Affected Area | राज्यात अतिवृष्टीमुळे रस्त्यांचं सुमारे 1800 कोटींचं नुकसान

मुंबई न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  Flood Affected Area | महाराष्ट्रात (Maharashtra) मुसळधार पावसाने राज्य जलमय करून टाकलं आहे. राज्यातील अनेक जिल्ह्याला पावसाने झोडपल्यामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती (Flood Affected Area) निर्माण झालीय. या मुसळधार पावसाने अनेक भागात दरडी कोसळल्या आहेत. यामुळे अनेक दुर्घटना घडल्या आहेत. अधिक मुसळधार पावसाने रस्ते देखील खचले आहे. या घटनांमुळे सार्वजनिक बांधकाम विभागाचं (Department of Public Works) एक मोठं नुकसान झाल्याचं समोर आलं आहे. अतिवृष्टीमुळे राज्यात जवळपास एक हजार 800 कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचा अंदाज सार्वजनिक बांधकाम विभागानं वर्तवला आहे. याबाबत माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण (Minister Ashok Chavan) यांनी दिलीय. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी सवांद साधला.

त्यावेळी बोलताना अशोक चव्हाण (Minister Ashok Chavan) म्हणाले, ‘राज्यातील संपूर्ण विभागात अतिवृष्टी, पूर आणि भूस्खलनाच्या घटना घडल्या. या घटनांमध्ये रस्ते आणि पुलांचे प्रचंड नुकसान झालेत. एकमेव कोकणात सर्वात अधिक तब्बल 700 कोटी रुपयांचे नुकसान झालंय.
त्यानंतर पुणे, अमरावती, औरंगाबाद, नागपूर आणि नाशिक विभागात देखील बरंच नुकसान झालं आहे.
तसेच, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील सगळ्यात जास्त नुकसान झालेल्या जिल्ह्यातील नुकसानीची पाहणी करण्यात येणार आहे.
ही पाहणी करण्यासाठी जिल्हानिहाय मुख्य अभियंते आणि समकक्ष दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे, अशी माहिती अशोक चव्हाण (Minister Ashok Chavan) यांनी दिली आहे.

 

या दरम्यान, अतिवृष्टी आणि पूरस्थितीच्या (Flood Affected Area) काळात साधारण 290 रस्ते वाहतुकीसाठी बंद केले होते. असा प्राथमिक अंदाज आहे.
दरम्यान, 469 रस्त्यावरची वाहतूक ठप्प झाली होती. तसेच, 140 पूल पाण्याखाली गेले होते.
येत्या 3 ऑगस्ट रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाची बैठक होणार आहे.
या बैठकीमध्ये महाराष्ट्रातील परिस्थितीचा आढावा घेतला जाणार आहे.
तसेच, त्या त्या ठिकाणच्या नुकसानीच्या रकमेमध्ये आणखीन वाढ होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे.

 

Web Title : maharashtra state heavy rainfall one thousand eight hundred loss in roads highest damage kokan

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pimpri Chinchwad Police | मौज मजेसाठी दुचाकी चोरणाऱ्यांना अटक, 3 लाखाच्या 10 दुचाकी जप्त

Online Game | 6 वी च्या मुलानं ऑनलाइन खेळला रक्तरंजित ‘गेम’, 40000 रुपये गमावल्यावर फास घेवून केली आत्महत्या; प्रचंड खळबळ

Pune Crime | 3 वर्षापासून फरार असलेल्या आरोपीला समर्थ पोलिसांकडून अटक