Maharashtra State Market Committee Co-operative Federation | महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी महासंघाच्या सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे बाळासाहेब नाहाटा

संतोष सोमवंशी उपसभापतीपदी; महासंघावर 'राष्ट्रवादी'चे वर्चस्व, शिवसेना, काँग्रेसलाही सत्तेत वाटा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra State Market Committee Co-operative Federation | महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघाच्या सभापतीपदी श्रीगोंदा (अहमदनगर – Ahmednagar) येथील राष्ट्रवादी (NCP) काँग्रेसचे प्रविणकुमार उर्फ बाळासाहेब नाहाटा (Pravin Kumar alias Balasaheb Nahata), तर उपसभापतीपदी लातूर (Latur) येथील शिवसेनेचे (Shivsena) संतोष सोमवंशी (Santosh Somvanshi) यांची बिनविरोध निवड झाली. २०२२ ते २०२७ या पाच वर्षांच्या कालावधीसाठी ही निवड असणार आहे. (Maharashtra State Market Committee Co-operative Federation)

 

तत्कालिन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील (Vasantdada Patil) यांनी पहिले अध्यक्षपद भूषविलेल्या आणि राज्यातील ३०१ बाजार समित्यांची शिखर संस्था असलेल्या सहकारी संघाची (Maharashtra State Market Committee Co-operative Federation) निवड प्रक्रिया मंगळवारी पार पडली. मार्केटयार्ड (Marketyard) येथील सहकारी संघाच्या मुख्यालयात झालेल्या या बैठकीला २१ पैकी १९ संचालक उपस्थित होते. निवडणूक अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधक नारायण आघाव (District Deputy Registrar Narayan Aghav), तर निवडणूक निरीक्षक म्हणून मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष अशोकराव डख (Ashokrao Dakh) यांनी काम पाहिले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray), उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar), महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat), सहकारमंत्री बाळासाहेब पाटील (Balasaheb Patil) आदी नेत्यांच्या मार्गदर्शनात ही निवड प्रक्रिया पार पडली.

नवनिर्वाचित संचालक मंडळात मनीष दळवी (भाजप, मुंबई-रत्नागिरी-सिंधुदुर्ग), केशव मानकर (भाजप, भंडारा-गोंदिया), दामोदर नवपुते (भाजप, औरंगाबाद-जालना), पोपटराव सोनावणे (राष्ट्रवादी, जळगाव-नंदुरबार-धुळे), रमेश शिंदे (राष्ट्रवादी, पुणे-सातारा), अशोकराव डख (राष्ट्रवादी, बीड-उस्मानाबाद), संजय कामनापुरे (राष्ट्रवादी, नागपूर-वर्धा), संदीप काळे (राष्ट्रवादी, राखीव), रंजना कांडेलकर (राष्ट्रवादी, राखीव), पंढरीनाथ थोरे (राष्ट्रवादी, राखीव), यशवंतराव जगताप (काँग्रेस, सोलापूर-सांगली-कोल्हापूर), आनंदराव जगताप (काँग्रेस, यवतमाळ), दिनेश चोखारे (काँग्रेस, चंद्रपूर-गडचिरोली), बाबाराव पाटील (काँग्रेस, राखीव), इंदुताई गुळवे (काँग्रेस, महिला राखीव), अंकुश आहेर (शिवसेना, परभणी-हिंगोली), सेवकराम ताथोड (शिवसेना, अकोला-बुलढाणा), ज्ञानेश्वर नागमोते (शिवसेना, अमरावती-वाशीम) यांचा समावेश आहे.

 

निवडीबद्दल आनंद व्यक्त करत बाळासाहेब नाहाटा म्हणाले, “आदरणीय वसंतदादा पाटील यांनी बाजार समिती संघाची स्थापना केली. त्यांनी भूषविलेल्या पदावर बसण्याची संधी मला मिळाली, हे भाग्य आहे. शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आणि बाजार समित्यांना पूर्वीसारखे वैभव प्राप्त करून देण्यासाठी आम्ही काम करणार आहोत. कोरोना, तसेच केंद्र सरकारने (Central Government) आणलेली नवी धोरणे यामुळे शेतकरी (Farmers), बाजार समित्यांपुढे (Market Committee) काही आव्हाने आहेत. विभागवार प्रश्न समजून घेत त्यावर काम करण्याचा आमचा प्रयत्न आहे. ३०१ बाजार समित्यांना विश्वासात घेऊन शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही यापुढे काम करू.”

संतोष सोमवंशी म्हणाले, “शिवसेनेला सहकारामध्ये उपसभापती पद मिळाले, याचा आनंद आहे.
महाविकास आघाडी सरकारच्या (Mahavikas Aghadi Government)
सर्व नेत्यांचे, संचालकांचे आभार मानतो.
या सहकारी संघात पक्षीय राजकारण बाजूला ठेवून भाजपनेही (BJP) मदत केली.
राज्यातील सर्व बाजार समिती आणि राज्य शासन (Maharashtra Government)
यांच्यातील दुवा म्हणून काम करण्याचा प्रयत्न यापुढील काळात महासंघ करेल.
पणन संचालक मंडळात प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळावी.”

 

Web Title :- Maharashtra State Market Committee Co-operative Federation | Balasaheb Nahata of NCP as the Chairman of Maharashtra State Market Committee Co-operative Federation

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा