25 ते 25 नोव्हेंबर कालावधीत यंदाचा १७ वा महाराष्ट्र राज्य पोलीस कर्तव्य मेळावा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – महाराष्ट्र राज्य पोलीस कर्तव्य मेळावा यंदा २५ ते ३० नोव्हेंबर कालावधीत पुण्यातील राज्य राखीव पोलीस दल गट क्रमांक १ व गट क्रमांक २ तसेच सीआयडीच्या महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी येथे होणार आहे.

कर्तव्य मेळाव्यात विज्ञानाची तपासात मदत, पोलीस फोटोग्राफी, पोलीस व्हिडीओग्राफो, घातपात विरोधी तपासणी स्पर्धा, संगणक स्पर्धा आणि श्‍वान स्पर्धा अशा प्रकारात होणार आहे.या स्पर्धांमध्ये पदक प्राप्त करणा-या स्पर्धकांची ६३ व्या अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्यासाठी निवड करण्यात येणार आहे.

पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी यांच्या व्यावसायिक कोशल्याची चाचणी करण्यासाठी
व व्यावसायिक गुणवत्ता सुधारण्यासाठी सन १९५३ पासुन अखिल भारतीय पोलीस कर्तव्य
मेळावा इंटेलिजेन्स ब्युरो (आय.बी.) यांचेमार्फत आयोजित केला जातो. स्पधैत देशातील राज्यांची सर्व पोलीस दले तसेच केंद्रिय पोलीस संघटना,आप-आपले संघ पाठवुन,कर्तव्य मेळाव्यात आपले व्यावसायिक कौशल्य दाखवतात.

गेल्या वर्षी उत्तरप्रदेश येथील ६२ व्या अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्यामध्ये (२०१८) संपुर्ण देशातुन एकुण २७ राज्य/संघराज्याच्या संघानी सहभाग नोंदविला होता. स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्य पोलीस दलाच्या संघाच्या वतीने एकुण ४० स्पर्धक सहभागी झाले होते. त्यामध्ये महाराष्ट्र राज्य पोलीसदलाच्या संघाने पहिल्यांदाच देशातील प्रथम क्रमांकाचा संघ म्हणुन जनरल चॅम्पियनशिप ट्रॉफी मिळवुन महाराष्ट्र पोलीस दलासाठी ऐतिहासिक कामगिरी केली आहे. त्याचप्रमाणे प्रकारामध्ये हार्ड लाईनर ट्रॉफी व पोलीस व्हिडीओग्राफो या स्पधेची रनरअप ट्रॉफी मिळवुनदैदिप्यमान कामगिरी केली आहे. त्यामध्ये महाराष्ट्र राज्य पोलीस दलाचे संघाने ऐतिहासिक कामगिरी करून ५ सुवर्ण, ३ रोप्यव ४ कास्यं असे एकुण १२ पदके प्राप्त केली आहेत.

Visit : Policenama.com

You might also like