Maharashtra State Skills University | महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ, पनवेल आयटीआय इमारतीचे राज्यपालांच्या हस्ते होणार भूमीपूजन

मुंबई: पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ (Maharashtra State Skills University) व पनवेल औद्योगिक प्रशिक्षण संस्था (Panvel Industrial Training Institute) यांच्या संयुक्त संकुल इमारतीचे सोमवारी दि. २७ मार्च २०२३ रोजी सकाळी ११.०० वाजता राज्यपाल रमेश बैस (Maharashtra Governor Ramesh Bais) यांच्या हस्ते भूमीपूजन करण्यात येणार आहे. (Maharashtra State Skills University)

या भुमीपूजन कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Maharashtra Chief Minister Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Maharashtra Deputy Chief Minister Devendra Fadnavis), कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha), उद्योग मंत्री तथा रायगड जिल्ह्याचे (Raigad District News) पालकमंत्री उदय सामंत (Maharashtra Industries Minister Uday Samant ) यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे.

राज्यातील युवक- युवतींना एकात्मिक आणि समग्र स्वरुपाचे कौशल्य प्रशिक्षण देण्याकरिता तसेच त्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील मान्यताप्राप्त कौशल्याधारित उच्च शिक्षणाद्वारे रोजगारक्षम करुन रोजगार, स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी राज्यात महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ स्थापन करण्यात आले आहे. विद्यापीठाचे कामकाज लवकरच सुरु करुन येत्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांना दर्जेदार कौशल्य शिक्षण देण्याचा शासनाचा मानस आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून या विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांना कौशल्य शिक्षण उपलब्ध होण्याकरिता ५ कौशल्य प्रशालांची (Skill Schools In Maharashtra) व त्याअंतर्गत अभ्यासक्रमाची निर्मिती करण्यात आली आहे. (Maharashtra State Skills University)

कौशल्य विद्यापीठाचे मुख्य कार्यालय सध्या तात्पुरत्या स्वरुपात एल्फिस्टन तांत्रिक महाविद्यालय,
मुंबई (Elphinstone Technical College in Fort Mumbai) येथे सुरु करण्यात आले आहे.
औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पनवेल येथील १० एकर जागा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या
मुख्यालयाकरिता उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
त्यानुसार महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचे मुख्यालय आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्था,
पनवेल यांचे एकत्रित बांधकाम (Integrated Campus) करण्याचे प्रस्तावित आहे.
हा परिसर ग्रीन कॅंपस तसेच नेट झीरो अशा पद्धतीचा असेल. पर्यावरणपुरक इमारत बांधकाम करण्याचा विद्यापीठाचा मानस आहे.

Web Title :- Maharashtra State Skills University | Foundation laying ceremony of Maharashtra State Skills University, Panvel ITI building will be held by the Governor

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

 

Pune Crime News | कॅनडातील मुलाच्या बनावट सह्या करुन डॉक्टर महिलेची जमीन हडपली; बारामतीमधील प्रकार

Maharashtra Solapur Farmer News | हमखास उत्पन्न देणाऱ्या रेशीम शेतीने उंचावले सौदागर पांडव यांचे जीवनमान

Johnson Charles | वेस्ट इंडिजच्या जॉन्सन चार्ल्सने वेगवान शतक झळकावत ख्रिस गेलचा मोडला ‘तो’ विक्रम