Maharashtra State Women Commission | कौमार्य चाचणीच्या घटनेची राज्य महिला आयोगाने घेतली दखल, अहवाल सादर करण्याचे आदेश

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra State Women Commission | एका विशिष्ट समाजातील उच्चभ्रू कुटुंबीयांकडून त्र्यंबकेश्वर येथील एका रिसॉर्टमध्ये लग्नसोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यापूर्वी समाजातील अनिष्ट रुढी-परंपरेनुसार जात पंचायतीच्या (jat panchayat) दबावाखाली डॉक्टर नववधूची कौमार्य चाचणी (Virginity test) होणार असल्याची तक्रार अंधश्रद्धा निर्मूलन समितीला प्राप्त झाली होती. त्यानुसार त्यांनी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात (Trimbakeshwar Police Station) तक्रार अर्ज केला होता. माध्यमांमध्ये यासंदर्भात वृत्त आल्यानंतर राज्य महिला आयोगाच्या (Maharashtra State Women Commission) अध्यक्ष रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी या प्रकरणाची दखल घेत अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षकांना (Superintendent of Police) दिले आहेत.

 

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (maharashtra andhashraddha nirmoolan samiti) पदाधिकाऱ्यांनी तक्रार अर्ज दिल्यानंतर पोलिसांनी विवाह समारंभात उपस्थित राहून, कौमार्य चाचणी होणार नसल्याचा लेखी जबाब वधू आणि वर यांच्या कुटुंबीयांकडून घेतला होता. परंतु या प्रकरणाची माध्यमांतून प्रसिद्धी झाल्यानंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी याची दखल घेत अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिले आहेत. तसेच त्याबाबत स्पष्टीकरण करणारा सद्य:स्थिती दर्शक अहवाल सादर करण्याबाबत उपसचिव दिया ठाकूर (Deputy Secretary Diya Thakur) यांनी पोलिसांना पत्र दिले आहे.

 

 

दरम्यान, पोलिसांना प्राप्त झालेल्या निवेदनानुसार पोलिसांनी घटनास्थळी जाऊन खात्री केली आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षकांकडून (Senior Police Inspector) तपासणी अहवाल अधीक्षक कार्यालयाला मिळालेला आहे.
तसेच आमच्या गोपनीय विभागाच्या पथकानेही लग्नाच्या एक दिवसाच्या अगोदर पासूनचे रिसॉर्ट मधील सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले आहेत.
पोलीस या लग्नसोहळ्यावर पूर्णपणे लक्ष ठेवून होते. तेथे कौमार्य चाचणी सारखी कुप्रथा पार पडलेली नाही.
तपासणी रिपोर्टनुसार महिला आयोगाकडे सविस्तर अहवाल सादर केला जाणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

 

Web Title :- Maharashtra State Women Commission | Maharashtra State Women Commission calls for report on virginity test case

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा