नगरमधील सैराट हत्याप्रकरणाची महिला आयोगाने घेतली दखल, अहवाल मागवला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील निघोज येथे आंतरजातीय विवाह केलेल्या मुलीला आणि जावायाला रॉकेल ओतून पेटवून देण्यात आले होते. या घटनेत मुलगी गंभीर भाजल्याने तिचा मृत्यू झाला तर तिच्या पतीवर पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणाची राज्य महिला आयोगाने गंभीर दखल घेतली असून पोलिसांना याबाबत कारवाई करण्याचे बजावण्यात आले आहे.

राज्य महिला आयोगाच्या सदस्या मंजुषा सुभाष मोळवणे यांनी पोलिसांना पत्र लिहून याबाबत विचारणा केली आहे. राज्य महिला आयोग अधिनियम १९९३ अंतर्गत कलम १० (१) (फ) व (दोन) नुसार आयोगाला महिलांशी निगडीत प्रकरणे स्विकारण्याचा आणि त्याची दखल घेण्याचा अधिकार प्राप्त असल्याचे पत्रात म्हटले आहे.

Letter-Sarat

या हत्याप्रकरणाची बातमी सर्व प्रसारमाध्यम आणि वृत्तपत्रांमध्ये आली. यानंतर राज्य महिला आयोगाने या प्रकरणाची दखल घेत अहमदनगर पोलीस अधीक्षकांना पत्र पाठवून आपणाकडून कोणती करावाई करण्यात आली याचा अहवाल मागवला आहे. तसेच याप्रकरणी तातडीने कारवाई होणे गरजेचे आहे. आपण व्यक्तीश: लक्ष घालून उचित कारवाई करावी असे महिला आयोगाने अधिक्षकांना पाठलेल्या पत्रात म्हटले आहे. तसेच याचा अहवाल राज्य महिला आयोगाला त्वरीत पाठववा असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.

पोलिसांनी या प्रकरणात मुलीचा मामा व काकाला अटक केली असून वडील फरार आहेत. मृत रुक्मिणी मंगेश रणसिंग आणि मंगेश चंद्रकांत रणसिंह या दोघांनी सहा महिन्यापूर्वी विवाह केला होता. त्यांचा आंतरजातीय विवाह असल्याने रुक्मिणीच्या घरच्यांचा याला विरोध होता.