Maharashtra State Women’s Commission | जुळ्या बहिणींशी लग्न करणाऱ्या तरुणाविराेधात तक्रार; घटनेवर राज्य महिला आयोगाने…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra State Women’s Commission | माळेवाडी अकलूज येथील हॉटेल गलांडे येथे शुक्रवारी अतुल आवताडे या तरुणाने कांदिवली येथील रिंकी व पिंकी या जुळ्या बहिणींशी एकाच वेळी विवाह केला. या लग्नाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. मात्र, जुळ्या बहिणींशी लग्न करणाऱ्या या तरुणाच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. या प्रकरणाची दखल महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने (Maharashtra State Women’s Commission) घेतली आहे.

या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर राज्य महिला आयोगाने पोलिसांना पत्र पाठवले आहे. सदर प्रकाराची त्वरित चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी, असा आदेश राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी सोलापूर पोलीस अधीक्षकांना दिला आहे. रूपाली चाकणकर यांनी ट्विट करत ही माहिती दिली. ‘सोलापूर येथील एका तरुणाने मुंबईतील जुळ्या बहिणींशी एकाच मांडवात लग्न केले आहे. ह्या लग्नाची सोशल मीडियातून सर्वत्र चर्चा सुरू आहे. तसेच माध्यमातून ह्या लग्नाच्या बातम्या सुरू आहेत. भारतीय दंड संहितेच्या कलम 494प्रमाणे हा गुन्हा आहे. तरी सोलापूर पोलीस अधीक्षक आपण उपरोक्तबाबत चौकशी करून त्वरित कायदेशीर कारवाई करावी. तसेच केलेल्या कारवाईबाबतचा अहवाल महाराष्ट्र राज्य महिला आयोग अधिनियम १९९३ चे कलम १२ (१) व १२ (२) अन्वये तात्काळ सादर करावा,’ असा आदेश त्यांनी सोलापूर पोलिसांना दिला आहे. (Maharashtra State Women’s Commission)

या वराविरुद्ध आधीच अकलूज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे.
अकलूज पोलिसांनी १९६०च्या कलम ४९४ नुसार द्विभार्या प्रतिबंधक कायद्यांतर्गत अतुल आवताडेवर गुन्हा
दाखल केला आहे. या प्रकरणाची तक्रार माळेवाडी-अकलूज येथील राहुल फुले या युवकाने
अकलूज पोलीस स्टेशन (Akluj Police Station) येथे दाखल केली होती.

Web Title :-  Maharashtra State Women’s Commission | young man in trouble who marries twin sisters women commission also took notice

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Aurangabad Crime | मुलीला पळवल्याच्या आरोपावरून वृद्ध महिलेला नग्न करून मारहाण; औरंगाबादमधील घृणास्पद प्रकार

Nashik Crime | पैशांसाठी नातवानेच केली आजी-आजोबांची निर्घृण हत्या; नाशिकमधील प्रकार

Pune Pimpri Crime | दुधिवरे खिंडीत सहलीतील विद्यार्थ्यांची बस खोल दरीत कोसळली; 3 जण गंभीर जखमी

Sanjay Raut | राज्यपालांची चहा बिस्केटे न खाता त्यांना शिवरायांच्या अपमानावर भाजप नेते प्रश्न विचारणार का? – संजय राऊत